Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

एक्स्प्रेस वेवर अपघातात चौघे ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील ढेकू गावच्या हद्दीत फुडमॉलजवळ भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणार्‍या ट्रकच्या मागे घुसल्याने कारमधील चार जण ठार झाले असून, दोघे गंभीर आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. पुण्याकडून इर्टिका कार (एमएच 14-एफजी 205)ने सहा प्रवासी मुंबईकडे जाण्यास निघाले …

Read More »

नेरळपाडा येथील रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल

वाहनचालकांना पर्यायी रस्त्याचा मोठा फेरा; विद्यार्थ्यांना शाळेलाही होणार उशीर कर्जत : बातमीदार नेरळ पूर्व व पश्चिम यांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे पाडा येथील रेल्वे फाटक रस्ता. मात्र नेरळ शहरात सुरू असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे आता नेरळमधील पाडा येथील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. नेरळ पूर्व भागातील सुमारे 50 च्या वर …

Read More »

मुरूड बांधकाम खात्याची चौकशी करा

समन्वय समितीचे अध्यक्ष जयवंत अंबाजी यांचे आदेश मुरूड : प्रतिनिधी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खाते हे बोगस कामांना प्राधान्य देत असून क्वॉलिटी कंट्रोल बोर्डाकडून कोणतेही प्रमाणपत्र न आणता ठेकेदारांना बिल अदा केले जाते.जेव्हा रस्त्याची कामे सुरु असतात तेव्हा मुरुड तालुक्यासाठी दोन अभियंते हे काम सुरु असताना उपस्थित राहत नाही. त्यामुळे …

Read More »

नीरव मोदीचा बंगला स्फोटानेही पडेना!

अलिबाग : प्रतिनिधी पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथील बंगला शुक्रवारी (दि. 8) नियंत्रित स्फोटाने जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. स्फोट घडवूनदेखील बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकला नाही. या बंगल्याचा …

Read More »

पाबळखोर्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध -रवींद्र चव्हाण

जांभोशी ते कोलेटी फाटा रस्त्याचे उद्घाटन पेण : प्रतिनिधी पाबळखोरे आजपर्यंत विकासापासून वंचित राहिले आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येत्या काळात कोट्यवधीचा निधी आणून या परिसराचा विकास साधणार, असा निर्धार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (7 मार्च) येथे व्यक्त केला. पेण तालुक्याच्या पाबळखोर्‍यातील जांभोशी ते कोलेटी फाटा रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री …

Read More »

अद्ययावत महाड बसस्थानकामुळे कोकणच्या विकासात भर -गीते

महाड : प्रतिनिधी महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते. महाड येथील अद्ययावत एसटी बसस्थानक हे कोकणाच्या वैभवात व विकासात भर टाकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गीते गुरुवारी (दि. 7) यांनी महाड येथील नूतन एसटी …

Read More »

हातपाटी व्यावसायिकांना सरकारचा आधार

सर्व गट खुले करा -महसूल मंत्री महाड : प्रतिनिधी : हातपाटी वाळू व्यवसायासाठी सावित्री खाडीसह जिल्ह्यातील इतर नद्यांमधील सर्व गट तत्काळ खुले करून देण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 6) मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिले. प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सावित्री खाडीसह रायगड जिल्ह्यातील पारंपरिक हातपाटीने वाळू …

Read More »

महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत -डॉ. पद्मश्री बैनाडे

अलिबाग : प्रतिनिधी महिला दुर्बल असल्यामुळे त्यांना आरक्षण दिले जाते. महिलांना आरक्षण नव्हे तर समान अधिकार मिळाले पाहिजेत.  ते मिळवण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन  रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी गुरुवारी (दि. 7) येथे केले. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांचे गुरुवारी वेश्वी येथील …

Read More »

पेट्रोलपंपावर काम करणारी एकमेव महिला मंजू बिलछाडी

खोपोली : प्रतिनिधी महिला काम करीत नाहीत, असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही. पेट्रोलपंपावर प्रामुख्याने पुरुष काम करताना आपण बघतो. मात्र आता या क्षेत्रातही महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. खालापूर तालुक्यात खोपोली-पेण रस्त्यावर सारसन या गावी असलेल्या ‘राम’ पेट्रोलपंपावर मंजू उमेश बिलछाडी (रा. शांतीनगर, खोपोली) या गेल्या 2 …

Read More »

डॉ. मोहन दोसी यांना ‘सेवाश्री’ पुरस्कार

माणगाव : प्रतिनिधी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल माणगाव येथील येथील डॉ. मोहन दोसी यांना सांगली येथील बिझनेस एक्सप्रेस व श्री फौंडेशनतर्फे बिझनेस एक्सप्रेस सेवाश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली येथील विष्णू भावे नाटय मंदिरात 16 मार्चला होणार्‍या कार्यक्रमात डॉ. दोसी यांना हा पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार …

Read More »