मोहोपाडा : प्रतिनिधी रामकृष्णा अकॅडमी व हरिग्राम केवाळे व्हिलेज यांच्या वतीने जिल्हास्तरावर किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहोपाडा, रसायनीतील खेळाडूंनी सहभाग घेत सुयश संपादन केले आहे. रसायनीतील किक बॉक्सिंग प्रशिक्षक संजय काशिनाथ पाटील व त्यांच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि पाच रौप्यपदके पटकाविली. यात वेदांत सोनावणे, अजय जाधव, …
Read More »मर्दानी स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप; पनवेलच्या खेळाडू व पंचांचे सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन व मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पंच परीक्षा व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पनवेलमधील खेळाडू आणि पंचांनी यश संपादन केले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व इंडियाच्या चेअरमन …
Read More »मिनीडोर संघटनेची क्रिकेट स्पर्धा रंगली
रेवदंडा : प्रतिनिधी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रेवदंडा, चणेरा, चौल, नागाव, वावे या संकल्प सिद्धी मिनिडोर इको संघटनेच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चौल हिंगुळजा देवी मैदानात नुकतेच झाले. या स्पधेर्र्त महेश मानकर संघाने बाजी मारली. स्पर्धेचा शुभारंभ माजी पं.स.सदस्य उदय काठे, संकल्प सिद्धी मिनिडोर संघटनेचे अध्यक्ष आदेश मोरे, खजिनदार संतोष म्हात्रे, …
Read More »हमरापूर प्रीमियर लीगचा दादर संघ मानकरी
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आदित्य इलेव्हन दादर संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघास आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते एक लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेत 17 संघ सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण समारंभास भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, रायगड …
Read More »रोठ बुद्रुक येथे रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार
युवा जिल्हाध्यक्ष चषकावर रोहा संघाने कोरले नाव आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 9) रोजी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथील हनुमान मंदिर क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने युवा जिल्हाध्यक्ष चषक स्पर्धा उत्साही वातावरणात …
Read More »आग्रोळी संघ एनएमपीएलचा विजेता
नवी मुंबई : बातमीदार बहुचर्चित एनएमपीएल अर्थात नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद आग्रोळी येथील जय मल्हार फायटर संघाने पटकाविले, तर गोठवली येथील साईप्रसाद संघाने उपविजेतेपदाला गवसणी घातली. एनएमपीएल टेनिस बॉल क्रिकेट लीग कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर रंगली. या स्पर्धेत नवी मुंबईतील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या …
Read More »दापोली संघ आमदार चषकाचा मानकरी; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक 2023 टेनिस क्रिकेट स्पर्धेत दापोलीच्या जय हनुमान क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. किरवलीचा ओम नर्मदेश्वर संघ द्वितीय क्रमांक पटकाविला. नावडे येथील मैदानावर चार दिवस या स्पर्धा पार पडल्या. उत्तम आयोजन आणि क्रिकेटचा थरार या …
Read More »कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द संघ विजेता
माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायत हद्दीतील महाराणा प्रताप नगरच्या वतीने आयोजित माजी आमदार तथा लोकनेते स्व. अशोकदादा साबळे स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द कबड्डी संघाने पन्हळघर संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांक उंबर्डी संघाने, तर चतुर्थ क्रमांक यजमान महाराणा प्रताप …
Read More »छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुलातील आठ जणांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे क्रीडाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या नितळस येथील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलातील आठ कुस्तीपटूंची पुणे येथे 10 जानेवारीपासून सुरू होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नयन रवींद्र पाटील (48 किलो वजनी गट), सुशांत नामदेव पाटील (60 किलो), …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून शरीरसौष्ठवपटू रमेश पाटील यांना शुभेच्छा
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावचे शरीरसौष्ठव रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, प्रशिक्षक सिद्धेश शिंदे, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper