पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथे राहणार्या सुमा सिद्धार्थ शिरूर यांना जाहीर झाला आहे. याआधी यापूर्वी 2003मध्ये सुमा यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांमध्ये सुमा शिरुर यांनी विविध पदके …
Read More »पोलार्डचा आयपीएलचा अलविदा!
मुंबई संघातून वगळल्यानंतर मोठा निर्णय मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी 2023मधील पर्वात मुंबई इंडियन्स संघाचा सर्वांत अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड वगळणार असल्याची चर्चा सुरू असताना वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूनेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल 2023साठी मिनी ऑक्शन होणार आहे आणि 15 नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व …
Read More »पोलादपूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात 7 ते 18 नोव्हेंबरदरम्यान तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते बालदिनी झाले. उद्घाटन समारंभास नायब तहसीलदार समीर देसाई, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, माजी जि. प. सदस्य सुमन कुंभार, माजी …
Read More »मोटरसायकल शर्यतीत रिसचा वेदांत व्दितीय
मोहोपाडा : प्रतिनिधी लोणावळा येथे झालेल्या ऑल इंडिया दि व्हिली रन 2022 क्लास एफ-3 या वेगवान व्हिली भारतीय मोटरसायकल स्पर्धेत खालापूर तालुक्यातील रिस येथील तरुण व प्रिआ स्कूलचा विद्यार्थी वेदांत सुधीर शिंदे याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वेदांत हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे याचा चिरंजीव असून या यशाबद्दल त्याचा गणेशनगर …
Read More »गव्हाण विद्यालयाचा मुलांचाही खो-खो संघ उपविजेता
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील मुलांचा संघही उपविजेता ठरला आहे. 14 वर्षे वयोगटातील अटीतटीच्या अंतिम लढतीमध्ये शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मुलांच्या संघाने सामना जिंकून विजेतेपद …
Read More »रायगड जिल्हा असोसिएशनतर्फे कबड्डी स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे प्रौढ गट पुरुष, महिला, कुमार गट मुले-मुली, किशोर गट मुले-मुली कबड्डी स्पर्धांना या हंगामात खर्या अर्थाने सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध गटांची स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे भालचंद्र स्पोर्ट्सच्या संयोजनाखाली 19 व 22 नोव्हेंबर रोजी कुमार गट कबड्डी …
Read More »हॉलीबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मांडवखार संघ विजेता
खारेपाट : वार्ताहर रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनतर्फे कोएसो हायस्कूल माणकुले येथील पटांगणात जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेत जय मल्हार स्पोर्ट्स मांडवखार संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत मुरूड, पेण, पाली, अलिबाग, खालापूर, पनवेल तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक मॉडेल संघ रांजणखार, तृतीय बोर्ली मांडला संघ, …
Read More »रायगड जिल्ह्यातील आर्यन पाटीलला उंच उडीत ‘सुवर्ण’
माणगाव : प्रतिनिधी आसाममधील गुवाहाटी येथे झालेल्या 37व्या नॅशनल ज्युनिअर अॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये उंंच उडी खेळात रायगड जिल्ह्यातील आर्यन अरुण पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत आर्यनने रौप्यपदक जिंकले होते. आर्यनला केंद्र शासनातर्फे पाच लाख आणि राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. आर्यन पाटीलचे वडील अरुण पाटील …
Read More »वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुसर्या सेमीफायनलचा थरार
भारत आणि इंग्लंड भिडणार अॅडलेड : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी (दि. 10) भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघ फॉर्ममध्ये असल्याने हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. भारताने या वर्ल्डकपमध्ये सुपर-12 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव वगळता सर्व सामने जिंकले …
Read More »आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत रायगडातील खेळाडू चमकले
उरण : बातमीदारी दिल्ली येथे नुकतीच दुसरी ओपन इंडियन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पनवेल, पेण व माणगाव तालुक्यातील चार खेळाडूंनी सहभाग घेत पदके जिंकली स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री रितिका सिंग, टेक्निकल कमिटी वाको चेअरमन रोमिओ देसा (क्रॉटिया), रेफ्री कमिटी रिंग स्पोर्ट्स वाको चेअरमन युरी लक्टिकोव (इस्टोनिया) यांच्या …
Read More »