नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिगरमानांकित किदम्बी श्रीकांतने कडवी झुंज देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात त्याला शनिवारी (दि. 16) अपयश आले. श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊ याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले. गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणार्या श्रीकांतने दुसर्या गेममध्ये सहा गेमपॉइंट …
Read More »विराटने मोडला धोनीचा आणखी एक विक्रम!
इंदूर : वृत्तसंस्था सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने बांगलादेशचा एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच विराट प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा डावाने मात देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दहावेळा प्रतिस्पर्धी संघाचा डावाने धुव्वा उडवला …
Read More »नवीन पनवेलमध्ये रंगली बॅडमिंटन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड शटलर्स बॅडमिंटन अॅकॅडमीच्या वतीने इन हाऊस बॅडमिंटन टुर्नामेंट 2019चे आयोजन नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी रायगड बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष …
Read More »स्वप्नील सोनावणेची शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड
पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील मेनन जिमचा शरीरसौष्ठवपटू स्वप्नील सोनावणे याची डायमंड श्री या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी इंडियन फेडरेशन बॉडी बिल्डिंग संघातून 60 किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा औरंगाबाद येथे 16 व 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेकरिता आशिया खंडातील जवळपास सर्व देशांतील खेळाडू …
Read More »वीर वाजेकर कॉलेजचे अॅेथेलॅटिक्समध्ये सुयश
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन अॅथेलॅटिक्स स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही स्पर्धा मरीन लाईन्स येथील क्रीडा संकुलात झाली. फुंडे महाविद्यालयातील अमृता महादेव पाटील या विद्यार्थिनीने हॅप्टेथॅलॉन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवित चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली. …
Read More »मयांकचे धडाकेबाज द्विशतक
दुसर्या दिवसअखेर भारत 6 बाद 493 धावा इंदूर : वृत्तसंस्था मयांक अग्रवालच्या धडाकेबाज द्विशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवसअखेर 6 बाद 493 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्या दिवशी 1 बाद 86 या धावसंख्येवरून शुक्रवारी (दि. 15) भारताने डावाला सुरुवात केली होती. …
Read More »पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी
हाँगकाँग : वृत्तसंस्था हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पी. व्ही. सिंधूने दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने 19व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला 21-15, 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याआधी सायना …
Read More »बांगलादेशी फलंदाजांचे लोटांगण
पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात; भारत 1 बाद 86 इंदूर : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसून आले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यापुढे बांगलादेशचा पहिला डाव केवळ 150 धावांत आटोपला. दरम्यान, …
Read More »स्केटिंग स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश
मोहोपाडा : प्रतिनिधी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन याक पब्लिक स्कूल येथील स्केटिंग रिंकवर करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. श्रीस्वामीनारायण गुरुकुलचा शेल सणस या विद्यार्थ्याने 17 वर्षांखालील क्वाड या गटात तीन रौप्यपदके, तर देव पटेल याने 14 …
Read More »मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा विजयी ‘चौकार’
मुंबई : प्रतिनिधी कर्णधार सूर्यकुमार यादवने साकारलेल्या आणखी एका धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुद्दुचेरीचा 27 धावांनी पराभव केला. ‘ड’ गटात अग्रस्थानी विराजमान असलेल्या यजमान मुंबईचा हा सलग चौथा विजय ठरला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 6 बाद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper