नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एका गोष्टीबाबत आपले मौन सोडले आहे. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यामुळे माझे शतक हुकले, असे गंभीरने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी आयसीसी वन डे वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे …
Read More »आरएमए मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोह्याच्या डोंगराळ भागात धावले रायगडातील नामवंत डॉक्टर्स रोहा : प्रतिनिधी सातारा मॅरेथॉनपेक्षाही धावण्यासाठी कठीण असलेल्या रोह्यातील डोंगराळ भागात आरएमए मॅरेथॉन 2019 अत्यंत उत्साहात झाली. या वेळी रायगड मेडीकल असोसिएशनच्या वतीने रन फॉर फीटनेसचा संदेश देण्यात आला, तसेच निरामय स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, धावले पाहिजे हेही या मॅरेथॉनच्या माध्यमातून …
Read More »भारतीय महिलांचा विजयी ‘चौकार’
अटीतटीच्या लढतीत विंडीज संघावर मात गयाना : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला सलग चौथ्या सामन्यात धूळ चारली. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ नऊ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला केवळ 45 धावाच करता आल्या आणि अटीतटीच्या सामन्यात भारत …
Read More »फडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठवण
मुंबई : ’बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र दिला आहे’, असे सूचक विधान करत भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहिली. या वेळी फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ …
Read More »श्रीलंका 10 वर्षांनी पाकमध्ये खेळणार दोन कसोटी सामने
इस्लामाबाद : वृत्तसंस्था श्रीलंकेने डिसेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामने खेळणार असल्याचे निश्चित केले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये एका दशकापेक्षाही मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चषकाचाच एक भाग असेल. वन डे कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि टी-20 कर्णधार लसिथ मलिंगासह 10 वरिष्ठ खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव …
Read More »निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, जय भारत, लालबाग स्पोर्ट्सची आगेकूच
मुंबई ः प्रतिनिधी जय भारत क्रीडा मंडळ, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, श्री गणेश क्लब, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वर क्रीडा मंडळ, नवोदित संघ यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात तिसरी फेरी गाठली. वडाळा-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या …
Read More »एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा, झ्वेरेव्हकडून नदाल पराभूत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे स्पेनच्या राफेल नदालचे एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र तरीही नदालचे एटीपी क्रमवारीतील अग्रस्थान अबाधित राहणार आहे. राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आंद्रे आगासी या गटातून स्टेफानोस त्सित्सिपासने पहिले, तर झ्वेरेव्हने दुसरे स्थान पटकावत उपांत्य …
Read More »क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी खेळतोय गोल्फ
रांची : वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासूनच क्रिकेटपासून दूर आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत असते, तर दुसरीकडे धोनी हा नेहमीच ‘कूल’ असतो. नुकताच धोनीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात तो केदार जाधव, माजी गोलंदाज आरपी सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसत …
Read More »मैदानात शिवीगाळ; गोलंदाजाला दिली शिक्षा
सिडनी : वृत्तसंस्था मैदानातच खेळाडूला शिवीगाळ करणे ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजाला महागात पडले आहे. सामना सुरू असताना खेळाडूबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध येत्या आठवड्यात सुरू होणार्या पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात येत्या आठवड्यापासून कसोटी सामना सुरू …
Read More »विराटवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उधळली स्तुतिसुमने
इंदूर : वृत्तसंस्था पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश विरूद्ध एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. दुसर्या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper