दोहा (कतार) : वृत्तसंस्था महाराष्ट्राची अव्वल नेमबाज तेजस्विनी सावंत हिने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले आहे. 14व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीला महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदकापर्यंत झेप घेता आली नसली तरी तिने पुढील वर्षी रंगणार्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी एक स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत मजल मारणार्या …
Read More »रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची व्यवस्था पाहून अभिनेत्री परिणीती चोप्रा बेहद खुश
पनवेल : प्रतिनिधी खेळासाठी पनवेलजवळ अद्ययावत, आंतरराष्ट्रीय आणि दर्जेदार सुविधायुक्त ठिकाण असेल असे वाटले नव्हते, पण उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये आल्यानंतर मी हे सगळे पाहून बेहद खुश झाले, असे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने म्हटले. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे काही चित्रिकरण आरटीआयएससीमध्ये 1 नोव्हेंबरपासून सुरू …
Read More »अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेस उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा …
Read More »‘हिटमॅन’ बरसला, भारत जिंकला!
दुसर्या टी-20 सामन्यात बांगलादेशवर मात राजकोट : वृत्तसंस्था पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या रोहित शर्माच्या भारतीय संघाने दुसर्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. बांगलादेशने विजयासाठी दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. कर्णधार रोहितने 85 धावांची खेळी करीत विजयात मोलाचा …
Read More »लिव्हरपूलचा विजय; बार्सिलोनाची बरोबरी
लिव्हरपूल : वृत्तसंस्था जॉर्गिन्होने पेनल्टीवर नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आयक्सला 4-4 अशा बरोबरीत रोखले, तर बलाढ्य बार्सिलोनाला स्लॅव्हिया प्रहाविरुद्धच्या लढतीत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतविजेत्या लिव्हरपूलने गेन्क संघावर 2-1 असा विजय मिळवला. अॅनफिल्ड स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात जिऑर्जिनो विज्नाल्डमने 14व्या मिनिटाला गोल करीत लिव्हरपूलला …
Read More »एकाच डावात घेतले 10 बळी
तेजपूर : वृत्तसंस्था मेघालयचा फिरकीपटू निर्देश बैसोयाने स्थानिक क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 16 वर्षाखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेत खेळत असताना नागालँड संघाविरोधात निर्देशने एकाच डावात 10 बळी घेतले आहे. 15 वर्षीय निर्देश हा मूळचा मेरठचा असून, काही वर्षांपूर्वी त्याने मेघालयकडून खेळण्यास सुरुवात केली आहे. निर्देशने नागालँडविरुद्ध सामन्यात पहिल्या …
Read More »भारतीय महिलांची विंडीजवर मात
मालिकाही जिंकली अॅटिग्वा : वृत्तसंस्था मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणार्या भारतीय महिला संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघावर मात करीत मालिकेत बाजी मारली आहे. तिसर्या सामन्यात भारतीय महिलांनी मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. स्मृतीलाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी …
Read More »‘धोनीला निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा’
मुंबई ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले काही दिवस महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयीची चर्चा सुरू आहे. विश्वचषकानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. निवड समितीनेही आगामी मालिकांमध्ये ऋषभ पंत पहिली पसंती असेल, असे म्हणत धोनीला सूचक इशारा दिला, मात्र धोनीसारख्या खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेसा निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा, असे मत प्रसिद्ध समालोचक हर्षा …
Read More »केपीएलमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग
क्रिकेटपटूला अटक बंगळुरू : वृत्तसंस्था मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये समोर आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)मध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याआधी केपीएलशी जोडल्या गेलेल्या एका टीमच्या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला …
Read More »साजन भानवालचे कांस्य हुकले जागतिक युवा कुस्ती स्पर्धा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तीन पदकांचा मानकरी ठरलेल्या साजन भानवाल (77 किलो) याला ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी भारताच्या रवीने (97 किलो) रिपिचेज फेरीत स्थान मिळवले आहे. तुर्कीच्या सेरकान अयोकुन याच्यासमोर भानवालचा निभाव लागला नाही. त्यामुळे कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper