दुबई : प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने भारतावर मात करीत विजेतेपद पटकाविले, मात्र या सामन्यानंतर जल्लोष करताना बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. पंचांनी वेळेतच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण या राड्यामुळे बांगलादेशच्या विजयाला गालबोट लागले. अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणात व्हिडीओ फुटेज …
Read More »व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने! भारताविरुद्धची वनडे मालिका न्यूझीलंडने 3-0ने जिंकली
माउंट माँगनुई : वृत्तसंस्था पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने घेतला. तिसर्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने पाच विकेट्सने विजय मिळवत मालिका 3-0ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले 297 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 17 चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर, तर रॉस टेलरला मालिकावीर …
Read More »भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका?
आयसीसीचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी तिसर्या अंपायरची मदत, जखमी खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी, आदी अनेक नवीन नियम सध्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी एका नियमाची भर पडली आहे व तो …
Read More »विल्यमसन पुनरागमनाच्या तयारीत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत 5-0 ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाला वन डे मालिकेत धक्का बसला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. तीन वन डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरच्या वन डे सामन्यात खेळणार आहे, मात्र या सामन्यातही भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे …
Read More »क्रिकेट स्पर्धेत धारणी संघ विजेता
मोहोपाडा : प्रतिनिधी कै. कु. सार्थक राकेश खराडे याच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर 22 वर्षांखालील खेळाडूंची एकदिवसीय स्पर्धा नुकतीच खेळली गेली. या स्पर्धेत सीएचबी धारणी संघाने विजेतेपद पटकाविले, तर तळेगाववाडी संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच संदीप मुंढे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते …
Read More »जडेजाने मोडला धोनी, कपिल यांचा विक्रम
ऑकलंड : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या वनडेत भारतीय संघाचा 22 धावांनी पराभव झाला आणि त्यामुळे भारताने मालिकादेखील 2-0ने गमावली. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नसला, तरी अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक शानदार खेळी केली आणि अखेरपर्यंत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला. जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत एक अनोखा विक्रम …
Read More »बुशफायर क्रिकेट बॅश : पाँटिंगच्या संघाचा एका धावेने रोमहर्षक विजय
मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात काही महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यातून नव्याने उभारी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मदतनिधी प्रदर्शनीय सामन्यात रिकी पाँटिंगच्या संघाने गिलख्रिस्टच्या संघावर अवघ्या एका धावाने रोमहर्षक विजय मिळवला. पाँटिंग एकादशने 10 षटकांत विजयासाठी दिलेले 105 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात गिलख्रिस्ट एकादश फक्त एका धावेने कमी पडला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना …
Read More »प्रो-हॉकी लीग; बलाढ्य बेल्जियमवर भारताची मात
भुवनेश्वर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रो-हॉकी लीग स्पर्धेत सहभागी हॉकी इंडियाने पहिल्या फेरीत नेदरलँडला पराभूत केल्यानंतर, बेल्जियमविरुद्धचा पहिला सामनाही 2-1च्या फरकाने जिंकला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा हॉकी स्टेडीयमवर हा सामना रंगलाज्यात भारताने धडाकेबाज खेळ करीत विजय मिळवला. गोलकिपर पी. आर. श्रीजेश या सामन्याचा हिरो ठरला. सुरुवातीच्या …
Read More »भारत-बांगलादेश यांच्या आज फायनल
केपटाऊन : वृत्तसंस्थाजगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष रविवारी (दि. 9) होणार्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील अंतिम सामन्याकडे लागले आहे. विश्वविजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई संघ मैदानात उतरतील.भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाने जर विजय मिळवला, तर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित विश्वचषक स्पर्धेचे …
Read More »भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियावर मात
मेलबर्न : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेले अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाने दिलेले 174 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. सात विकेट्स राखत भारतीय महिलांनी हा सामना जिंकला.नाणेफेक जिंकत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने …
Read More »