Breaking News

क्रीडा

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश

खारघर : रामप्रहर वृत्त जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मध्ये झाली. या स्पर्धेत यजमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे …

Read More »

रिषभ पंतऐवजी वृद्धिमान साहाला संधी?

मुंबई : प्रतिनिधी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा बर्‍याच काळापासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. लवकरच त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंतऐवजी साहाला संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत व्यवस्थापनाकडून मिळत आहेत. साहाला अनुभव आणि यष्टीरक्षण कौशल्यामुळे टीम इंडियात पुन्हा जागा …

Read More »

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्जतच्या मल्लांची ‘ताकद’

कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये कर्जत तालुक्यातील मल्लांनी मोठी कामगिरी केली आहे. कुस्तीमधील चारही गटात कर्जतचे मल्ल अव्वल ठरले. कर्जतच्या सावळे येथील मल्लांनी तालुक्यात बाजी मारून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. जिल्हास्तरावरदेखील त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. 48 किलो …

Read More »

तीन षटके, शून्य धावा, तीन बळी!

भारताच्या दिप्ती शर्माची अफलातून गोलंदाजी सुरत : वृत्तसंस्था हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 11 धावांनी मात केली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताच्या दिप्ती शर्माने भन्नाट गोलंदाजी करीत आफ्रिकेच्या फलंदाजांची पिसे काढली. दिप्तीने …

Read More »

भारताच्या जलतरण संघाला रीलेमध्ये ‘सुवर्ण’

बंगळुरू : वृत्तसंस्था आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी 4 बाय 100 मीटर पुरुषांच्या फ्री स्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले. भारतीय संघाने 3:23.72 सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणार्‍या इराणच्या संघाने 3:28.46 सेकंद अशी …

Read More »

आकाश चोप्राकडून उमेश यादवचा बचाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा जसप्रीत बुमराह पाठीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवची आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली. निवड समितीने बुमराहच्या जागी यादवला संघात घेतल्यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात टीका …

Read More »

भारताला दुहेरी धक्का

सिंधू पहिल्याच फेरीत गारद सेऊल : वृत्तसंस्था विश्वविजेती भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात तिला बिवेन झँग हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे भारताचा बी. साईप्रणीत याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच …

Read More »

रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या कार्यवाहपदी आशिष पाटील यांची निवड

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या कार्यवाहपदी रायगड जिल्हा खो-खो संघाचा माजी कर्णधार राष्ट्रीय खेळाडू  आशिष पाटील याची निवड करण्यात आली. रायगडभूषण पुरस्कार विजेते दीपक मोकल यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच अलिबाग येथील जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयात झाली. या सभेत जमाखर्च मंजूर …

Read More »

‘बीसीसीआय’ची 23 ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक अशी ओळख असलेल्या बीसीसीआयची सार्वत्रिक निवडणूक 22 ऑक्टोबरऐवजी 23 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात होणार्‍या विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने ही निवडणूक एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र …

Read More »

सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंचे सुयश; तिघांची राष्ट्रीय स्तरावर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाटकमधील निपाणी येथील केएलई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या साऊथ झोन सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धा 2019-20मध्ये पनवेल महापालिका हद्दीतील चार खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके पटकाविली. 14 वर्षांखालील मुलींच्या 51 किलोखालील गटात …

Read More »