खारघर : रामप्रहर वृत्त नंदूरबार फेन्सिग असोसिएशनतर्फे पाथ्री येथील के. डी. गावित एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आयोजित कॅडेट महाराष्ट्र राज्य तलवारबाजी चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. ‘आरटीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आपली चमकदार कामगिरी स्पर्धेत दाखविली. यामध्ये सांघिक प्रकारात …
Read More »टी-20 मालिका बरोबरीत
बंगळुरू : वृत्तसंस्था कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतावर नऊ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले. तीन टी-20 सामन्यांची ही मालिका अखेरीस 1-1 अशा बरोबरीत सुटली आहे. भारताने विजयासाठी दिलेले 135 धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज …
Read More »सीकेटी विद्यालयात कराटे स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त जपान कराटे सोतोकाई 24वी राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 22) नवीन पनवेल येथील सीकेटी हायस्कूलमध्ये झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप नेते एकनाथ भोपी, पांडुशेठ केणी, आत्माराम पाटील, …
Read More »रायगडच्या दोघांची वॉटरपोलो संघात निवड
पाली : प्रतिनिधी एशियन एज ग्रुप भारतीय वॉटरपोलो संघात रिलायन्स नागोठणे येथील राज विनायक पाटील व वेदांत उद्धव कुथे यांची निवड झाली आहे. खेडेगावात वास्तव्यास असलेल्या या खेळाडूंनी जलतरण क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. त्यांना प्रशिक्षक दत्ता तरे यांचे मार्गदर्शन लाभले. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, …
Read More »म्हात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
उरण : प्रतिनिधी आयईएस जवाहरलाल नेहरू विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. त्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत म्हात्रे विद्यालयाची समीक्षा गावंड हिने थाळीफेकमध्ये प्रथम व गोळाफेकमध्ये द्वितीय, मन म्हात्रे याने थाळीफेकमध्ये प्रथम, ॠतिक पाटीलने उंच उडीत …
Read More »दीपक पुनियालाही रौप्यपदकावर समाधान
नूर सुलतान (कझाकस्तान) : वृत्तसंस्था अमित पंघलपाठोपाठ भारताचा नवोदित कुस्तीपटू दीपक पुनिया यालाही जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 86 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे दीपक अंतिम फेरीत खेळूच शकला नाही, ज्यामुळे इराणच्या हझसन याझदानीला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. पहिल्याच अजिंक्यपद स्पर्धेत दीपकने रौप्यपदकाची …
Read More »टीम इंडिया मालामाल!
भत्त्यांमध्ये बीसीसीआयकडून दुप्पट वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या आणि परदेश दौर्यावर सर्वोत्तम कामगिरी करीत आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौर्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. एका बातमीनुसार परदेश दौर्यावर असताना भारतीय …
Read More »आयपीएलमुळे श्रीलंकन खेळाडूंचा पाकिस्तानला यायला नकार
कराची : वृत्तसंस्था पाकिस्तान दौर्यातून श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने मात्र याबाबत भलताच दावा केला आहे. आयपीएलमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये यायला नकार दिला, असे आफ्रिदीने म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौर्याला हिरवा कंदील देण्यात आला आहे. पाकिस्तान दौर्यात श्रीलंका तीन ट्वेन्टी-20 …
Read More »2021च्या अपंग क्रिकेटपटूंच्या विश्वचषकाचे भारताला यजमानपद
मुंबई : प्रतिनिधी अपंगांच्या विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणार्या भारतीय क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी खूशखबर आहे. 2021च्या अपंगांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात अपंगांच्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडला 36 धावांनी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. मुंबईत या विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक सुलक्षण …
Read More »भारत ‘अ’ संघ विजेता
म्हैसूर : वृत्तसंस्था भारत ‘अ’ संघाचा प्रतिभावान फलंदाज प्रियांक पांचाळने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात झुंझार शतक झळकावले, परंतु दिवसाचा खेळ संपल्यावर पंचांनी हा सामना अनिर्णित जाहीर केल्याने भारताने या मालिकेत 1-0 असे यश संपादन केले. बिनबाद 14 धावांवरून पुढे खेळताना भारताने सावध खेळ केला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper