Breaking News

क्रीडा

भारताची ‘विजया’दशमी, पहिल्या कसोटीत आफ्रिकेवर दणदणीत विजय

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत मात करीत मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी नऊ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या संघाने दोन सत्रांमध्येच विजय साकारला. दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी (5/35) आणि रवींद्र जडेजा (4/87) यांच्या …

Read More »

भारतीय पुरुष संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

अँटवर्प (बेल्जियम) : वृत्तसंस्था ‘ड्रॅगफ्लिकर’ हरमनप्रीत सिंग याच्या दोन गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियम दौर्‍यातील दुसर्‍या सामन्यात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या स्पेनवर 6-1 असा दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत (28व्या आणि 32व्या मिनिटाला), कर्णधार मनप्रीत सिंग (24व्या मिनिटाला), निळकंठ शर्मा (39व्या मिनिटाला), मनदीप सिंग (56व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग …

Read More »

टी-20मध्ये विश्वविक्रम; चौकारांचा पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर बेथ मुनी हिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध रविवारी (दि. 29) झालेल्या टी-20 सामन्यात तिने 61 चेंडूंत 113 धावांची स्फोटक खेळी केली. त्यात तिने तब्बल 20 खणखणीत चौकार लगावले. टी-20मधील हा विश्वविक्रम आहे. बेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीने …

Read More »

…म्हणून भारताच्या पदरी पराभव! ; युवराज सिंगने मांडले अत्यंत परखड मत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. संपूर्ण स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची यावर अनेक चर्चा घडत राहिल्या, मात्र एकाही फलंदाजाला या जागेवर आश्वासक कामगिरी करता …

Read More »

क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी महिलेची निवड

चेन्नई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची मुलगी रूपा गुरुनाथ यांची तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रूपा यांना टीएनसीएच्या 87व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. बीसीसीआयच्या कोणत्याही राज्य संघटनेमध्ये महिला अध्यक्ष बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत, पण सर्वोच्च …

Read More »

मी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो : रैना

चेन्नई : वृत्तसंस्था वन डे आणि टी-20 सामन्यांमध्ये मी क्रमांक चारवर फलंदाजी करू शकतो, असे सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाने म्हटले आहे. रैना गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शेवटचा सामना खेळला होता. सध्या तो टी-20 विश्वचषकापूर्वी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. सन 2020 आणि 2021मध्ये दोन टी-20 विश्वकप स्पर्धा होणार …

Read More »

मला 2019च्या विश्वचषकात खेळायचे होते, पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघ 2019च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. सुमार फलंदाजीचा भारतीय संघाला फटका बसला. त्यामुळे तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. या सामन्यानंतर या स्पर्धेबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या, पण आता बर्‍याच काळाने पुन्हा विश्वचषक स्पर्धा चर्चेत आली आहे. मला 2019ची विश्वचषक स्पर्धा …

Read More »

बुद्धिबळपटू मोक्षदा शेटची विभाग स्तरावर निवड

कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील शारदा मंदिर शाळेच्या मराठी माध्यमात शिक्षण घेणारी मोक्षदा दिनेश शेट या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे तिची कोकण विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल शारदा मंदिरच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पुराणिक, तसेच मणेर यांनी मोक्षदा शेट हिचे अभिनंदन केलेे. मोक्षदा शाळेच्या …

Read More »

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई : प्रतिनिधी इंडोनेशियातील बटाम येथे 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान रंगणार्‍या 53व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 65 जणांचा भारतीय संघ गुरुवारी (दि. 26) इंडोनेशियाला रवाना झाला असून, अनेक शरीरसौष्ठवपटूंकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. सहा वेळा जागतिक विजेता बॉबी सिंग तसेच सबरे सिंग, जयप्रकाश, वैभव …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत उज्ज्वल यश

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका अंतर्गत येथे झालेल्या 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत झाली. या स्पर्धेत ‘आरटीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन …

Read More »