निवड समिती पर्यायांच्या शोधात मुंबई : प्रतिनिधी यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतील ढासळलेला फॉर्म हा गेल्या काही दिवसांमधला भारतीय संघासाठीचा चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी पंतला पसंती देणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर विंडीज दौर्यात पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली, …
Read More »कुस्तीत सुरेखा वाघमारे सरस
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्जत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तिघर शाळेतील सुरेखा शंकर वाघमारे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. रायगड जि. प. शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध खेळांचा समावेश असतो. यंदा कर्जत तालुकास्तरीय …
Read More »धोनीचा क्रिकेटमधील टाइम संपलाय : गावसकर
मुंबई : प्रतिनिधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा टाइम आता संपलाय. टीम इंडियाने आता त्याच्या पलीकडे पाहायला हवे,’ असे गावसकर यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर यांनी हे वक्तव्य केले. ‘धोनीच्या मनात …
Read More »बॉक्सर अमित पंघल फायनलमध्ये
एकतरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था भारताचा बॉक्सरपटू अमित पंघलने शुक्रवारी (दि. 20) इतिहास रचला. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यात कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोवचा 3-2 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली; तर दुसरीकडे भारताच्या मनीष कुमारला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या अमित पंघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) …
Read More »टेबल टेनिस स्पर्धेस भरघोस प्रतिसाद
अनिशा, दजांग एकेरीचे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात खेळली गेली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रायगड …
Read More »प्रो कबड्डी : ‘यू मुम्बा’ने ‘यूपी’ला रोखले
पुणे : प्रतिनिधी अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवालच्या आक्रमक चढायांना सुरिंदरसिंग आणि फझल अत्राचलीच्या पकडींची साथ मिळाल्याने यू मुम्बा संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघावर 39-36 अशी मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. पूर्वार्धात यूपी योद्धाच्या रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल यांनी आपला करिष्मा दाखवायला …
Read More »सायना नेहवाल पराभूत; सिंधूची विजयी सलामी
चँगझ्होयू (चीन) : वृत्तसंस्था भारताच्या सायना नेहवालला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तर वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफनने सायना नेहवालला 21-10, 21-17 असे सहज नमवले. सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या ली शूरुईवर …
Read More »विराट कोहली दुसर्या स्थानावर; आफ्रिदीनेही केले कौतुक
मोहाली ः वृत्तसंस्था भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 150 धावांचे लक्ष्य कोहलीने शिखर धवन आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या साथीने पूर्ण केले. …
Read More »दोन पदके निश्चित;अमित, मनीष उपांत्य फेरीत
ईकॅटरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था अमित पांघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) यांनी बुधवारी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील दोन पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने फिलिपिनो कार्लो पालमचा 4-1 असा पराभव केला, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील …
Read More »मालिका बरोबरीत, तरीही ‘अॅयशेस’ ऑस्ट्रेलियाकडे
लंडन : वृत्तसंस्था अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली आहे. मागच्या वर्षीची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. म्हणूनच अॅशेस चषक त्यांच्याकडे कायम राहिला. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper