Breaking News

क्रीडा

जसप्रीत बुमराहच्या 100 विकेट्स

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील यॉर्कर किंग गोलंदाज जसप्रीत बुमराहने वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना शंभर गडी बाद करण्याचा मान मिळविला. भारताकडून सर्वात जलद बळींचे शतक साजरे करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 57व्या सामन्यात ही कामगिरी केली. भारताकडून सर्वाद जलद 100 विकेट घेण्याचा विक्रम …

Read More »

‘हिटमॅन’ बनला ‘बिग बॉस’

लीड्स : वृत्तसंस्था भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक ठोकले. या स्पर्धेतील रोहितचे हे पाचवे शतक ठरले. यासोबतच एका विश्वचषक स्पर्धेत शतकांचा ‘पंच’ देणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा बहुमान रोहितने मिळविला आहे, तर  विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सहा शतके करून त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या …

Read More »

भारत-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड भिडणार ; विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतींचे चित्र स्पष्ट

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियावर मात केल्याने गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रलियाची दुसर्‍या स्थानी घसरण झाली असून, भारताने पहिले स्थान पटकाविले आहे. यासोबतच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा सात गडी राखून दणदणीत पराभव केल्याने …

Read More »

शाकीबने मोडला सचिनचा विक्रम

लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने अखेरच्या साखळी सामन्यातही आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावताना शाकीबने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 50पेक्षा अधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत शाकीबने सचिनला मागे टाकले आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत …

Read More »

शोएब मलिकची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षापूर्वीच ठरवले होते, असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले. शोएबने ट्विटरवरूनही याबद्दल माहिती दिली. ‘आज मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. त्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, …

Read More »

अँजेलोची शतकी खेळी

थिरिमनेसोबत श्रीलंकेचा डाव सावरला लंडन : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने 50 षटकांत 7 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (113) आणि थिरिमनेचे अर्धशतक (53) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला, मात्र …

Read More »

चिवे शाळेत कबड्डी प्रशिक्षण शिबिर

सुधागड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कबड्डीची मोठी परंपरा आहे. याला अनुसरून सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेत आरंभ प्रतिष्ठान ठाणे यांच्या सौजन्याने व श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ भायखळा मुंबई यांच्या सहकार्याने कबड्डी शिबिर घेण्यात आले. या वेळी प्रशिक्षक प्रवीण शिंदे व व अपर्णा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कबड्डीचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दिले. यात …

Read More »

ऑस्ट्रेलिया संघाला दोन धक्के ; एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर

लंडन : वृत्तसंस्था वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा  संघ अव्वल स्थानावर विराजमान असून, अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून हे स्थान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे, पण उपांत्य फेरीत तगड्या संघाचा सामना करण्यापूर्वीच ऑसी संघाला दोन मोठे धक्के बसले आहे. पाच वेळा वर्ल्ड कप उंचावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत खेळण्यापूर्वी त्यांच्या …

Read More »

भारतात मिळालेल्या प्रेम व आपुलकीने भारावलो ; लाराचे उद्गार; डॉक्टरेट पदवीने सन्मान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना लाराने भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून, हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहिल, असे सांगितले. नेरूळ येथे झालेल्या समारंभात डॉ. डी. वाय. …

Read More »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ; महाराष्ट्राच्या संघाची सायलीकडे धुरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील पाटणा शहरात 11 ते 14 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सिन्नर (नाशिक) येथे झालेल्या 66व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून अंतिम संघाची निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या सायली केरीपाळेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. अंतिम …

Read More »