Breaking News

क्रीडा

हरभजन, ताहिर जुन्या दारूसारखे : धोनी

चेन्नई : वृत्तसंस्था कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि इम्रान ताहिरचे कौतुक करताना मिश्किल टिप्पणी केली आहे. हरभजन आणि ताहिर हे जुन्या दारूसारखे आहेत. दिवसेंदिवस ते परिपक्व होत चालले आहेत. वय हा केवळ एक आकडा आहे हे त्यांनी पुन्हा सिद्ध …

Read More »

विजयासह चेन्नई अव्वलस्थानी

चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर सात गडी राखून मात केली. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली असून, पहिल्या क्रमांकावरील कोलकत्ता दुसर्‍या स्थानकावर घसरला आहे. कोलकात्याने ठेवलेल्या 109 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचीही दमछाक झाली. कोलकात्याच्या माफक आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 17.2 षटकांमध्ये केला. चेन्नईचा सलामीवीर फाफ …

Read More »

गर्दीच्या वेळेत दरवाजा अडवणार्‍यांवर कडक कारवाई करा; प्रवासी संघटनांची मागणी

डोंबिवली ः प्रतिनिधी गर्दीच्या वेळेत लोकलमधील दरवाजे अडवल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केला होता, पण ती अडचण केवळ दिवा स्थानकातील प्रवाशांची नसून बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कळवा आदी स्थानकांमधील प्रवाशांचीही आहे. त्यासाठी दरवाजा अडवणार्‍या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या …

Read More »

मेस्सी आणि सुआरेजच्या गोलमुळे बार्सिलोना विजयी

बार्सिलोना : वृत्तसंस्था लुईस सुआरेज आणि लियोनेल मेस्सी यांनी दोन मिनिटांच्या अंतरातच केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने रविवारी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रीद संघावर 2-0 असा विजय मिळवला. या शानदार विजयासह बार्सिलोनाने विजेतेपदाकडे भक्कम आगेकूच केली आहे. मेस्सीसाठी ला लीगामधील हा विक्रमी 335 वा विजय आहे, तसेच त्याने आणि …

Read More »

फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल यांची निवड

क्वालालंपूर : वृत्तसंस्था अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना 46 पैकी 38 मते मिळाली. आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि …

Read More »

बंगळुरूचा पराभवाचा षटकार

बंगळुरू : वृत्तसंस्था बंगळुरूने यंदाच्या आयपीएल मोसमातली आपली निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दिल्लीने बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या पराभवामुळे यंदाच्या पर्वातील बंगळुरूचा हा सलग 6वा पराभव ठरला आहे. बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 150 रनचे आव्हान दिल्लीने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्लीने विजयी आकडा 7 चेंडू शिल्लक …

Read More »

कोलकाताची राजस्थानवर सहज मात

जयपूर : वृत्तसंस्था गोलंदाजांच्या नियंत्रित मार्‍यानंतर ख्रिस लीन (50) व सुनील नरेन (47) यांच्या तुफानी 91 धावांच्या सलामीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने एकतर्फी सामन्यात बाजी मारत राजस्थान रॉयल्सचा 8 गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणार्‍या राजस्थानला 20 षटकात 3 बाद 139 धावांत रोखल्यानंतर कोलकाताने 13.5 षटकात केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात …

Read More »

दिल्लीचा बंगळुरूवर 4 गडी राखून विजय

बंगळुरू ः वृत्तसंस्था बंगळुरू संघाची हाराकिरी सुरूच असून, दिल्लीने बंगळुरूवर 4 गडी राखून विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळताना बंगळुरूला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत दिल्लीचा विजय दृष्टिपथात आणला. सामनावीराचा मान कागिसो रबाडा याला मिळाला. बंगळुरूने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या …

Read More »

…तर आम्ही तळालाच राहणार -विराट कोहली

बेंगळुरू : वृत्तसंस्था द्विशतकी आव्हान उभारूनही गोलंदाजांनी नांगी टाकल्याने बेंगळुरूला कोलकात्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यामुळे सहाजिकच कर्णधार विराट कोहलीचा पारा चढला असून त्याने लढतीनंतर प्रतिक्रिया देताना गोलंदाजांची चांगलीच खरडपट्टी काढली, अशी सुमार गोलंदाजी केल्यानंतर सहाजिकच पराभव पत्करावा लागणार… अन् तुम्ही तळ गाठणार, असे विराट कडाडला. बेंगळुरूच्या 206 धावांचा पाठलाग करताना …

Read More »

फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल यांची निवड

क्वालालंपूर : वृत्तसंस्था अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना 46 पैकी 38 मते मिळाली. आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि …

Read More »