Breaking News

क्रीडा

चेन्नईचा कोलकातावर 5 गडी राखून विजय

कोलकाता : वृत्तसंस्था इम्रान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताचे 162 धावांचे लक्ष्य चेन्नईने 5 गडी राखून सहज पार केले. ताहीरने 27 धावांत 4 बळी घेतले, तर रैनाने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताचा हा सलग तिसरा …

Read More »

कबड्डी स्पर्धेत कालंबादेवी युवक गडब अंतिम विजेते

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील कमलपाडा येथे श्रीराम मंडल कमलपाडा यांच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीराम नवमी उत्सवाचे औचित्य साधून रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कालंबादेवी युवक गडब संघाने जय हनुमान चरी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद …

Read More »

वडिलांची काळजी घेत ‘तो’ खेळतोय सामने

मुंबई : प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू पार्थिव पटेल सध्या आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणींचा सामना करत आहे. तरी देखील पार्थिव पटेल लक्ष देऊन टीमकडून खेळत आहे. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी संघर्ष करीत आहेत, ती त्याच्यासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. पार्थिवचे वडील गुजरातमधील अहमदाबादमध्ये ब्रेम हॅमरेजशी लढत आहेत. पार्थिव सामना …

Read More »

पराभवाचा वनवास संपला; बंगळुरूचा तब्बल 6 सामन्यांनंतर पहिला विजय

मोहाली : वृत्तसंस्था बंगळुरूने पंजाबचा 8 गडी राखून पराभव केला आहे. पंजाबने बंगळुरूला विजयासाठी 174 धावांचे आव्हान दिले होते. ते आव्हान बंगळुरूने 4 चेंडू शिल्लक ठेवून आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आहे. या विजयासोबतच बंगळुरूने यंदाच्या पर्वातील पहिला सामना जिंकला आहे. बंगळुरूकडून सर्वाधिक 67 धावा कॅप्टन विराट कोहलीने केल्या, …

Read More »

सिंधू उपांत्य फेरीत

सिंगापूर : वृत्तसंस्था संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, मात्र सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या चीनच्या काइ यानयानला पराभूत करण्यासाठी सिंधूला तीन गेमपर्यंत …

Read More »

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार

मुंबई : प्रतिनिधी विजय क्लब, उजाला क्रीडा मंडळ, अमर क्रीडा मंडळ, शिवशंकर मंडळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, ओम् कबड्डी, जय भारत मंडळ, अमरहिंद मंडळ, अंकुर स्पोर्ट्स, मावळी मंडळ, सत्यम सेवा मंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ, स्वस्तिक मंडळ आणि गोलफादेवी मंडळ यांनी बंड्या मारुती मंडळाने आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद …

Read More »

गब्बर इज बॅक!

कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये शुक्रवारी (दि. 12) दिल्लीने कोलकातावर सात गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 179 धावांचे आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या होत्या, मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव …

Read More »

बार्सिलोनाचा मँचेस्टर युनायटेडवर विजय

मँचेस्टर : वृत्तसंस्था लिओनेल मेसीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली, तरी बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यात मँचेस्टर युनायटेडवर 1-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. ल्युक शॉ याच्या स्वयंगोलमुळे 12व्या मिनिटाला बार्सिलोनाने खाते खोलले. त्यानंतर बार्सिलोनाने गोल करण्याच्या अनेक संधी …

Read More »

भारतीय महिलांचा मालिका विजय

क्वाललांपूर : वृत्तसंस्था मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा 1-0 असा पराभव करीत पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला तिसर्‍या सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. यानंतर चौथा सामना जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिलांनी अखेरच्या सामन्यातही बाजी मारून मालिका विजयावर शिक्का …

Read More »

बीसीसीआय पदाधिकार्‍यांना इंग्लंडवारीस परवानगी

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्‍यांच्या परदेश दौर्‍यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने निर्बंध लादले होते, पण आता प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेत बदल केला असून, ज्यांना आयसीसी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयचा कारभार हाकणार्‍या प्रशासकीय समितीने आपल्या सदस्यांसाठी जून-जुलै …

Read More »