Breaking News

क्रीडा

मांडवा येथे जिल्हास्तरीय कबड्डी महोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महिला व पुरुष गटाचे सामने होणार आहेत.  स्व. निलम शशिकांत दळवी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा 16 …

Read More »

प्रजनेश गुणेश्वरचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल संपुष्टात आली आहे. प्रजनेशनला क्रोएशियचा खेळाडू इवो कार्लोविचविरुद्ध 3-6, 6-7 (4-7)ने पराभव स्वीकारावा लागला. पहिला सेट एकतर्फी झाल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये प्रजनेशने जबरदस्त झुंज देताना कार्लोविचला चांगली लढत दिली. या वेळी सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मोक्याच्या वेळी प्रजनेशने केलेली …

Read More »

मोहम्मद गुफरान, काजल कुमारी विजेते

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान आणि अग्रमानांकित काजल कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत गुफरानने रंगतदार तीन गेम रंगलेल्या लढतीत बिनमानांकित ठाण्याच्या राजेश गोहिलचा 21-25, 25-14, 25-11 असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. महिला एकेरीमध्ये …

Read More »

ऋतुराजचा अफलातून झेल

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग गटात अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीत प्रवेश केला. लीगच्या शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने रेल्वेवर 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. हा झेप पाहून पंचही चक्रावले. ऋतुराजच्या या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

ऑस्ट्रेलियाची आव्हानात्मक मजल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताविरुद्ध बुधवारी (दि. 13) खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात उस्मान ख्वाजाने शतकी (100) खेळी केली. त्याला पीटर हँड्सकॉम्बने अर्धशतक (52) करून चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 273 धावा केल्या. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 43 चेंडूंत 27 …

Read More »

धवन म्हणतो, मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘माझ्याबाबत होणार्‍या टीकांना मी कधीच प्रत्युत्तर देत नाही; कारण मी माझ्याच विश्वात असतो,’ अशा शब्दांत भारताचा सलामीवीर शिखर धवनने टीकाकारांना उत्तर दिले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये एकही शतक झळकावू न शकल्याने धवनच्या कामगिरीवर टीका होऊ लागली होती, पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात धवनने 143 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम …

Read More »

वॉर्नर विश्वचषकाचा मालिकावीर ठरेल

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे दमदार पुनरागमन करतील, असा दावा केला आहे. वॉर्नर हाच यंदाच्या विश्वचषकाचा मालिकावीर ठरेल, असाही अंदाज वॉर्नने व्यक्त केलाय. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत तूल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार …

Read More »

दुर्गामाता संघ अजिंक्य

मुंबई : प्रतिनिधी राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्सने एसएसजी फाऊंडेशनचा 37-34 असा पराभव करीत रोख 21 हजार व स्वप्नसाफल्य चषक आपल्या नावे केला. दुर्गामाता स्पोर्ट्सचा प्रथमेश पालांडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुंबई शहर कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत याच दोन संघात …

Read More »

नदाल, फेडररची आगेकूच

इंडियन वेल्स (अमेरिका) : वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडच्या दिग्गज रॉजर फेडररनेदेखील विक्रमी सहाव्या विजेतेपदाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे. इंडियन वेल्समध्ये तीन वेळेसच्या विजेत्या नदालने जेयर्ड डोनाल्डसन याचा अवघ्या 72 मिनिटांत 6-1, 6-1 असा पराभव …

Read More »

केंटो मोमोता, चेन युफेई विजेते

बर्मिंगहम : वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोता याने डेन्मार्कच्या बलाढ्य व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन याला हरवून प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पहिल्यांदाच जिंकले. विशेष म्हणजे या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मोमोता पहिला जपानी खेळाडू ठरला. त्याच वेळी महिला गटामध्ये चीनच्या चेन युफेई हिनेही पहिल्यांदाच या स्पर्धेत बाजी मारताना …

Read More »