Breaking News

क्रीडा

आयर्लंडच्या खेळाडूचा विक्रम

डेहराडून : वृत्तसंस्था अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या मालिकेत अफगाणिस्तानने 7 गडी राखून सामना जिंकला. चौथ्या डावात अफगाणिस्तानला देण्यात आलेले 147 धावांचे आव्हान त्यांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रहमत शाह (76) आणि इहसनुल्लाह (नाबाद 65) यांच्या 139 धावांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला, पण …

Read More »

‘एक धाव इंडियन आर्मी’साठी! सैनिकांच्या सन्मानार्थ 1100हून अधिक महिलांचा मॅरेथॉनमध्ये सहभाग

नवी मुंबई : बातमीदार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम स्टडिज् यांच्या संयुक्त विद्यमाने होत ‘एक धाव इंडियन आर्मी’साठी घोषवाक्य नजरेसमोर ठेवत महिलांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या 5 किमी मीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये 1100हून अधिक महिलांनी सहभागी …

Read More »

तायक्वॉन्डो कलर बेल्ट परीक्षेत 384 खेळाडूंचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड तायक्वॉन्डो असोसिएशनतर्फे पळस्पे येथील पी. जे. बी. स्कूल येथे तायक्वॉन्डो या खेळाच्या कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत या स्कूलमधील 384 खेळाडू सहभागी झाले होते. सातवी डिग्री ब्लॅक बेल्ट तायक्वॉन्डोचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुभाष पाटील आणि सहाय्यक प्रशिक्षक रूपेश माळी, तेजस …

Read More »

पुण्याच्या अवंतिकाला ‘सुवर्ण’

हाँगकाँग : वृत्तसंस्था गतवर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणार्‍या पुण्याच्या अवंतिका नराळेने शनिवारी (दि. 16) अभिमानास्पद कामगिरी केली. हाँगकाँग येथे सुरू असलेल्या युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अवंतिकाने सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला. तिने 11.97 सेकंदच्या वेळेसह 100 मीटर शर्यतीत बाजी मारली.   खेलो इंडियामध्ये अवंतिकाने …

Read More »

महाराष्ट्र संघाने जिंकला टी-20 दिव्यांग चषक

औरंगाबाद : प्रतिनिधी महाराष्ट्र संघाने अखिल भारतीय टी-20 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. दीपक जावळेने कर्णधाराला साजेल अशी केलेली फलंदाजी आणि अभिलाष लोखंडे याचा अष्टपैलू खेळ या बळावर महाराष्ट्राने गरवारे क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थानवर पाच गडी राखून मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून …

Read More »

ड्युमिनीची निवृत्ती

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली, मात्र आफ्रिकेकडून ट्वेंटी-20 क्रिकेट संघासाठी उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. ड्युमिनीने सप्टेंबर 2017मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ‘गेले काही महिने मी संघाबाहेर आहे आणि आता मला पुन्हा संधी मिळाली आहे. विश्रांतीच्या …

Read More »

…तर भारताचा संघच वर्ल्डकप जिंकेल -पाँटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी जबदरदस्त आहे. जर विराटचे नशीब चांगले राहिले; तर भारतच हा विश्वचषक जिंकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केला आहे. आयपीएलमध्ये यंदा दिल्लीला मार्गदर्शन करणार्‍या पाँटिंगने एका मुलाखतीमध्ये आपली मते दिलखुलासपणे व्यक्त केली. 2019 विश्वचषकाबद्दल प्रश्न …

Read More »

गोवठणे येथे उद्या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वर्तक यांच्या वतीने होळी सणाचे औचित्य साधून रविवारी (दि. 17) 40 वर्षांवरील (फोर्टी प्लस) खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील गोवठणे येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा उरण पूर्व विभाग मर्यादित असून, प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव धोक्याची घंटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरचे मैदान गाजवणार्‍या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिकाही जिंकली. आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाचा हा फॉर्म अतिशय चांगला असल्याने अनेकांनी भारताला विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार मानले होते, मात्र घरच्या मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाला …

Read More »

कर्नाटकने जिंकला सय्यद मुश्ताक अली चषक

इंदूर : वृत्तसंस्था मयांक अगरवालची तुफानी फटकेबाजी आणि रोहन कदमच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला आठ गडी व नऊ चेंडू राखून धूळ चारत विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. नौशाद शेख (नाबाद 69) …

Read More »