Breaking News

क्रीडा

भारतीय वंशाचा समीर बॅनर्जी ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेचा जेता

लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय वंशाच्या अमेरिकन स्थायिक समीर बॅनर्जीने  विम्बल्डनच्या मुलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. 17 वर्षीय समीरने अंतिम फेरीत ब्रिटनच्या व्हिक्टर लिलोव्हला 7-5, 6-3 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. त्याचे हे कारकीर्दीतील पहिलेच जेतेपद ठरले. यापूर्वी 1954मध्ये भारताच्या रामनाथन कृष्णनने विम्बल्डनमध्ये मुलांच्या एकेरीचे जेतेपद मिळवले होते.दरम्यान, क्रोएशियाच्या निकोला मेकटिच …

Read More »

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचची बाजी

20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीवर वर्चस्व गाजवून कारकीर्दीतील 20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे वर्षातील आणि विम्बल्डनमधीलही सलग तिसरे अजिंक्यपद ठरले.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या 34 वर्षीय जोकोव्हिचने सातव्या मानांकित बेरेट्टिनीला 6-7 (4-7), 6-4, 6-4, 6-3 असे चार …

Read More »

इटली अजिंक्य!

इंग्लंडला नमवत युरो चषक जिंकला लंडन ः वृत्तसंस्थाइटलीने इंग्लंडवर मात करून युरो कप 2020च्या विजेतेपदाचा मान पटकावला. वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये इटलीने 3-2ने बाजी मारली.स्पर्धेतील सर्वांत जलद गोल करीत दणदणीत सुरुवात करणार्‍या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक, …

Read More »

अर्जेंटिनाच्या विजयाचा कोल्हापुरात जल्लोष; हलगीच्या तालावर चाहत्यांनी धरला ठेका

कोल्हापूर ः प्रतिनिधी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने ब्राझीलचा 1-0ने पराभव केला. अर्जेंटिनाने 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा जल्लोष अर्जेंटिनामध्ये सुरू आहेच, पण इकडे महाराष्ट्रातील कोल्हापुरातदेखील या विजयाचा जल्लोष झाला. कोल्हापूरकरांचे फुटबॉल प्रेम नव्याने सांगायची …

Read More »

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; भारताविरुद्ध मालिकेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

कोलंबो ः वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका संघामधील अडचणी वाढत चालल्या आहेत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता श्रीलंकेच्या खेळाडूलाही करोनाने ग्रासले आहे. या संकटामुळे भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. ‘न्यूजवायर’च्या वृत्तानुसार श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीरक्ककोडीला करोना झाला आहे. संदुन हा श्रीलंकेच्या दांबुला येथे असलेल्या शिबिरात सराव …

Read More »

बार्टी विम्बल्डन ओपनची नवी सम्राज्ञी

लंडन ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करीत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (2019) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. प्लिस्कोव्हाची कडवी लढत मोडीत काढत बार्टीने 6-3, 6-7 (4/7), 6-3 असा विजय मिळवत जेतेपद …

Read More »

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : अर्जेंटिना विजेता; ब्राझील पराभूत

रियो दि जानेरो ः वृत्तसंस्था संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या ब्राझीलला हरवत 1-0 अशा फरकाने विजेतेपदावर नाव कोरले. तब्बल 28 वर्षांनंतर या स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. कोपा अमेरिका स्पर्धेत नेमारचा ब्राझील आणि लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी …

Read More »

…तर मीसुद्धा आयपीएल खेळणार नाही!

धोनीच्या सहभागासंदर्भात रैनाची प्रतिक्रिया चंदिगड ः वृत्तसंस्थाभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी डावखुरा फलंदाज सुरैश रैना चांगले मित्र आहेत. हे दोघे आधीपासून आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) महत्त्वाचे खेळाडू आहेत. आता रैनाने धोनीविषयी एक प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे या दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे समोर आले आहे.रैनाने म्हटले आहे …

Read More »

भारत-श्रीलंका मालिका चार दिवस लांबणीवर

कोरोना संसर्गामुळे निर्णय कोलंबो ः वृत्तसंस्थाश्रीलंका क्रिकेट संघाच्या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्धचे सहा सामने चार दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिला एकदिवसीय सामना आता 13 जुलैऐवजी 17 जुलै रोजी होईल.इंग्लंड दौर्‍यावरून परतलेले फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि विदा विश्लेषक जी. टी. निरोशान यांना कोरोना झाल्यामुळे …

Read More »

जोकोव्हिच वि. बेरेटिनी रविवारी फायनल

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीत जोकोव्हिचने शापोवालोव्हचा 7(7)-6(3), 7-5, 7-5 असा पराभव केला. जोकोव्हिच सातव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आता रविवारी (दि. 11) होणार्‍या अंतिम फेरीत जोकोव्हिचची लढत इटलीच्या मटेओ बेरेटिनीशी असणार आहे.सातव्या मानांकित मटेओ बेरेटिनीने …

Read More »