Breaking News

क्रीडा

मुंबईतील सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांची सराव सत्रे सुरू आहेत, परंतु मुंबईत सराव करणार्‍या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने सरावाला प्रारंभ केला. हा संघ …

Read More »

तलवारबाजपटू रिद्धी पाटीलचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील तलवारबाजपटू रिद्धी पाटील हिने 24 ते 26 मार्चदरम्यान ओडिशातील कटक येथे झालेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सेबर या प्रकारात कांस्यपदक मिळवले. याद्वारे तिने रायगड जिल्ह्यास पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. …

Read More »

ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज सज्ज -सुमा शिरूर

मुंबई ः प्रतिनिधी टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज आहेत, असे मत भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले आहे. भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 30 पदके मिळवत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. त्या पार्श्वभूमीवर शिरूर बोलत होत्या. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना (एनआरएआय) आणि भारतीय क्रीडा …

Read More »

शार्दुल ठाकूरला मिळाली महिंद्रांनी गिफ्ट केलेली गाडी

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेली दमदार थार एसयूव्ही गुरुवारी (दि. 1) मिळाली. याबद्दल शार्दुलने महिंद्रा यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत. अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे …

Read More »

पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार?

आयसीसीचे मोठे पाऊल दुबई ः वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे. भारतात यंदा ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि त्या संदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे.  भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, …

Read More »

‘आरसीबी’च्या नव्या खेळाडूची वादळी खेळी

ख्राइस्टचर्च ः वृत्तसंस्था आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार्‍या न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलनने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. अ‍ॅलनचा फॉर्म आरबीसीसाठी उपयुक्त ठरू शकतो. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील तिसर्‍या ट्वेण्टी-20 सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि 10-10 षटकांचा सामन्यांना निर्णय झाला. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा …

Read More »

पंचांच्या निर्णयामध्ये बदल

दुबई ः वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान डीआरएसमधील अंपायर्स कॉलबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही यासंबंधित मुद्दा उपस्थित केला होता. आयसीसीने आता डीआरएसमध्ये काही गोष्टी बदलल्या आहेत. त्यानुसार तिसर्‍या पंचांना डीआरएसच्या बाबतीत काही अधिकार मिळाले आहेत, पण अंपायर्स कॉल कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला …

Read More »

वनडे क्रमवारीत विराट अव्वलस्थानी कायम

दुबई ः वृत्तसंस्था आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्‍या क्रमांकावर असून, तो पाकिस्तानच्या बाबर आजमच्या मागे आहे, तर के. एल. राहुलने 31व्या स्थानावरुन 27व्या स्थानावर …

Read More »

ऑलिम्पिकचे आयोजन धोक्यात

टोकियो ः वृत्तसंस्था कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जपान हे सुरक्षित ठिकाण नाही, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी संयोजकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा चार महिन्यांवर आली असताना संयोजन समितीने जोखमीची तीव्रता कमी केल्याचा दावा केला आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांचे मात्र समाधान झालेले नाही. कोरोनाच्या जोखमीचे …

Read More »

नवी जर्सी, नवा जोश!; मुंबई इंडियन्सचे खास फोटोशूट

चेन्नई ः वृत्तसंस्था आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने 9 एप्रिलपासून आयपीएलला प्रारंभ होणार आहे. सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघ चेन्नईत दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्स ट्विटरवरुन खेळांडूसंबंधी अपडेट देत फोटो शेअर करीत …

Read More »