लैंगिक शोषणाचा आरोप लाहोर ः वृत्तसंस्था पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमविरुद्ध गुरुवारी (दि. 14) एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोर येथील सत्र न्यायालयाने पोलिसांना पाकिस्तानच्या कर्णधारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. कोर्टाने बाबरविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. …
Read More »रोहित शर्माने केली टीकाकारांची बोलती बंद
ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला खरा, पण त्यानंतर रोहितवर काही जणांनी टीका केली होती. रोहित अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे काही टीकाकारांनी म्हटले होते, पण रोहितने या टीकाकारांची बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितचा एक भन्नाट व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. …
Read More »ब्रिस्बेन कसोटी : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ
लाबूशेन, नटराजनची शानदार कामगिरी ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेनच्या शतकाच्या जोरावर 5 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करीत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठविला. ब्रिस्बेन …
Read More »पुनीत बिश्तचा विक्रमी झंझावात; 51 चेंडूंत 146 धावा
इंदूर : वृत्तसंस्था सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी (दि. 13) मेघालयाचा कर्णधार पुनीत बिश्त याने 51 चेंडूंत नाबाद 146 धावा ठोकल्या. मिझोरमविरुद्धच्या सामन्यात त्याने 17 षटकार आणि सहा चौकारांची आतषबाजी केली. टी-20 मध्ये चौथ्या स्थानावर येऊन सर्वाधिक धावा ठोकण्याच्या विश्वविक्रमाची बिश्त याच्या नावावर नोंद झाली आहे. त्याने श्रीलंकेचा …
Read More »थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सायना, श्रीकांत दुसर्या फेरीत
बँकॉक : वृत्तसंस्था स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि माजी नंबर वन किदाम्बी श्रीकांत यांनी थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. कश्यपने मात्र मांसपेशींच्या दुखण्यामुळे सामन्यातून माघार घेतली. सायनाने मलेशियाची प्रतिस्पर्धी सेल्वादुरारे किसोना हिचा 21-15, 21-15 ने पराभव केला, तर श्रीकांतने आपलाच सहकारी सौरभ वर्मा …
Read More »ऑस्ट्रेलियाला धक्का; दुखापतग्रस्त विल पुकोव्हस्की संघाबाहेर
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचे ग्रहण लागले असतानाच आता यजमान संघाला दुखापतीचा फटका बसताना दिसत आहे. पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तिसर्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना पुकोव्हस्की जमिनीवर पडला. त्याच्या शरीराचा भार त्याच्या हातावर आला …
Read More »भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आज अंतिम सामना; उभय संघांची ‘कसोटी’
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारी (दि. 15) ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळविण्यात येत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक सामना उभय संघांनी जिंकला असून, एक सामना अनिर्णीत राहिला असल्याने उरलेला सामन्यात मालिकेचा निकाल लागतो की हाही सामना अनिर्णीत होऊन मालिका बरोबरीत सुटते …
Read More »चौथ्या कसोटीत खेळण्यास तयार!; सेहवागची बीसीसीआयला मजेशीर ऑफर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा व निर्णायक कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकून चषकावर कब्जा करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील, मात्र भारतीय संघ दुखापतींमुळे बेजार आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येताहेत. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज …
Read More »भारतीय खेळाडू सुविधांपासून वंचित?; हॉटेलमध्ये करावी लागतेय टॉयलेटची सफाई
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्यावर टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ब्रिस्बेन येथे होणार्या चौथ्या कसोटीवर कोरोना व्हायरसमुळे संकट होते. त्यातही भारतीय संघ तेथे दाखल झाला, मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाइन नियमांत सूट मिळालेली नाही. उलट त्रास वाढला आहे. एका वृत्तानुसार भारतीय संघ मंगळवारी ब्रिस्बेन …
Read More »जडेजा म्हणतो, लवकरच परतणार!
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर सिडनी येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठ्याला दुखापत झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर जडेजाने लवकरच संघात परतण्याचे संकेत दिले आहेत. तिसर्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper