Breaking News

क्रीडा

राजस्थानची केकेआरवर मात; गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप

मुंबई ः प्रतिनिधी भेदक गोलंदाजी आणि संजू सॅमसनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल सामन्यात केकेआरवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा तळाला आठव्या स्थानावर होता, पण शनिवारच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाला. राजस्थानने गुणतालिकेत आता सहावे स्थान पटकावले असून केकेआरचा …

Read More »

ख्रिस मॉरीसवर पीटरसन नाखूश

मुंबई ः प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सची ह्या आयपीएल सीझनमधील आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये सर्वांत तळाशी आहे.आजवरच्या आयपीएल लिलावातील मॉरीस हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे, मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असे मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे. मॉरीसने …

Read More »

भारताच्या सात महिला बॉक्सरना सुवर्णपदक

वार्सा ः वृत्तसंस्था पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडू गितिका, अरुंधती चौधरी, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, सानामचा चानू, विन्का आणि अल्फिया पठाण या सात जणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले. सात सुवर्णांसह भारताने 2017च्या हंगामातील कामगिरीला मागे टाकले. त्या वेळी भारतीय महिलांनी तीन सुवर्णपदक मिळवले होते. महिलांच्या 48 किलो …

Read More »

इटलीतील फुटबॉल क्लब्जना महासंघाचे अभय

रोम ः वृत्तसंस्था युरोपियन फुटबॉलमध्ये बंडखोरी करून सुपर लीगच्या आयोजनाचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. इटलीतील फुटबॉल क्लब्जनी माघार घेण्यापूर्वी सुरुवातीला या स्पर्धेच्या आयोजनाला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता होती, मात्र इटालियन फुटबॉल महासंघाने त्यांना कोणतीही शिक्षा सुनावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लिव्हरपूल, अ‍ॅटलेटिको माद्रिद, आर्सेनल, …

Read More »

रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम

आयपीएलमध्ये सहा हजारधावांचा टप्पा पार मुंबई ः प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयपीएलमध्ये सहा हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने 196 सामन्यांत हा विक्रम प्रस्थापित केला असून, यात पाच शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान …

Read More »

ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा

अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारला वगळले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आगामी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी अनुभवी सुशील कुमारला वगळण्यात आले आहे. याचप्रमाणे माजी आशियाई विजेत्या अमित धानकरला (74 किलो) राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या संदीप मानपेक्षा प्राधान्य दिले आहे. सोफिया (बल्गेरिया) येथे 6 ते 9 मे या कालावधीत होणारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता …

Read More »

‘आरसीबी’चा विजयी चौकार

देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी; राजस्थान पराभूत मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ची विजयी घोडदौड सुरुच असून, राजस्थानविरुद्धचा सामना जिंकत बंगळुरूने एकही  गडी न गमावता आरामात जिंकला आणि विजयी चौकार मारला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 178 धावांचे लक्ष्य बंगळुरूने कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीर जोडीने 16.3 …

Read More »

धवनकडून आयपीएलमध्ये पाच हजार धावांचे ‘शिखर’ सर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल 2021च्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. मागील मोसमातील अंतिम सामन्यांसह दिल्लीला सलग चार सामन्यांमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु दिल्लीने या मोसमात बरोबरी साधली. दिल्लीच्या विजयात अमित मिश्रा, शिखर धवन हे खेळाडू नायक ठरले. धवनने आपल्या 45 धावांच्या …

Read More »

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) टेन-10 म्हणजेच 10 षटकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांनीही ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने आता आयसीसी यावर कशा प्रकारे तोडगा …

Read More »

चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक; कोलकातावर मात करून गुणतक्त्यात अव्वल स्थानी

मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी मात करीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 220 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु …

Read More »