मुंबई ः प्रतिनिधीयंदा भारताच्या वनडे विश्वचषक विजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एकत्र सामन्याचा आनंद …
Read More »डी-कॉकच्या अनोख्या खेळीमुळे पाक फलंदाज मुकला द्विशतकाला
जोहान्सबर्ग ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू फखर जमान याचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने ज्या पद्धतीने फखरला धावबाद केले त्यावरून वाद सुरू झाला आहे. या सामन्यात पाकचा सलामीवर फखरने 155 चेंडूंमध्ये 193 धावांची दमदार खेळी केली, मात्र या खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानवर 17 धावांनी …
Read More »आयपीएल वेळापत्रकाप्रमाणे होणार
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 9 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आयोजनाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.एएनआय या …
Read More »अर्जुन, पृथ्वीचा जुना फोटो व्हायरल
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. यंदा भारताच्या विश्वविजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन …
Read More »‘केकेआर’मध्ये रिंकू सिंहच्या जागी गुरकीरतसिंग मानला संधी
कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)च्या संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी मोसमात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू गुरकीरतसिंग मानला संघात समाविष्ट केले आहे. 30 वर्षीय पंजाबचा अष्टपैलू खेळाडू गुरकीरतने आयपीएलमध्ये एकूण 41 सामने खेळले …
Read More »धोनीला अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी
चेन्नई ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सज्ज झाला आहे. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल 2020तील निराशाजनक कामगिरीला मागे सोडून धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार संघाने केला आहे. गतवर्षी आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील अखेरचा सामना आहे का, असे विचारण्यात आले होते …
Read More »आयपीएलचे सामने मुंबईतच होणार?
मुंबई ः प्रतिनिधी वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणार्या 10 कर्मचार्यांना आणि संयोजन समितीच्या सहा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांबाबतची चिंता वाढली आहे, परंतु अल्पसूचनेद्वारे पर्यायी ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे मुंबईतील सामने अन्यत्र हलवता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट …
Read More »मियामी ओपनचे अॅश्ले बार्टीला विजेतेपद
मियामी (अमेरिका) ः वृत्तसंस्था मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात बार्टी आणि कॅनडाची बिआन्का अँड्रेस्कू आमनेसामने आले होते, मात्र दुखापतीमुळे बिआन्काने माघार घेतली. त्यामुळे बार्टीला विजेता घोषित करण्यात आले. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने पहिला सेट 6-3 असा नावावर केला. दुसर्या …
Read More »अक्षर पटेलला कोरोनाची लागण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलच्या आगामी पर्वाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाने ग्रासले होते, मात्र त्यानंतर तो निगेटिव्ह …
Read More »पुण्याच्या अमेयने चोपल्या 61 चेंडूंत 167 धावा
दुबई ः वृत्तसंस्थादुबईत सुरू असलेल्या टी-20 लीगमध्ये राजकोट थंडर्स संघाचा पुणेकर फलंदाज अमय सोमण याने वादळी खेळी केली. त्याने 61 चेंडूंत 167 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीत 15 चौकार व 14 षटकारांचा समावेश आहे.अमेयने कारा डायमंड्स संघाविरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने 19 चेंडूंत …
Read More »