महाड : प्रतिनिधी – महाड बाजारपेठ खुली करण्यात आली असून, सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस बाजारात गर्दीने उच्चांक गाठला आहे. सर्वच दुकानांतून अंतर ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवला जात असल्याने महाड शहरवासीयांना धोका निर्माण झाला आहे. मुंबई, पुण्यातून मूळ गावी परतलेले …
Read More »मिनीडोअर वाहतूक सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी
रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर संघटनेची मागणी पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे मिनीडोअर प्रवासी सेवा बंद झाल्याने चालक व मालकांचे प्रचंड हाल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वाहने उभी असल्याने आर्थिक उत्पन्नच थांबल्याने उपासमारीची वेळ आली. त्यामुळे शासनाने ही वाहने शेअर पद्धतीने सहा+एक या पद्धतीने सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा प्रत्येक रिक्षा, …
Read More »अफवांवर विश्वास ठेवू नका -वनाधिकारी
नागोठणे : प्रतिनधी – नागोठण्यात आढळलेला प्राणी हा हिंस्र प्रकारातील नसून ते रानमांजर होते, असा निर्वाळा येथील वन विभागाचे मुख्य वनाधिकारी किरण ठाकूर यांनी दिला असून, स्थानिक जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे. नागोठणे शांतीनगर भागातील सूर्यदर्शन कॉलनी तसेच टॉकीज परिसरात गुरुवारी (दि. 21) सायंकाळी वाघ …
Read More »धाटाव एमआयडीसीत लॉकडाऊन काळात 800 कोटींचे उत्पादन बुडाले
रोहे : प्रतिनिधी – कोरोनाचे संकट आल्यावर जगभर मंदीचे सावट आहे. महत्त्वाचे म्हणजे औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. रोहा तालुक्यातील सर्वात जुन्या असलेल्या धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना याचा फटका बसला आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात सुमारे 800 कोटींचे उत्पादन बुडाले आहे. देशात व राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना …
Read More »कोरोना लढ्यात लोणेरे येथील विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून योगदान
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास 21 हजार रुपयांचा धनादेश माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सामाजिक जाणीवेतून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्याकरिता रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला 12 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी पतसंस्थेचे …
Read More »नेरळजवळ गावठी हातभट्टी उद्ध्वस्त
कर्जत : बातमीदार – उल्हास नदीच्या तीरावर उकरूळ गावाच्या हद्दीत नेरळ पोलिसांच्या पथकाने गावठी दारुभट्टी उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहुन साधारणत: 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत उकरूळ गावच्या मागे उल्हास नदीच्या तीरावर गावठी दारूभट्टी सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांना मिळाली …
Read More »जिल्ह्यात 33 नवीन कोरोना रुग्णांची वाढ
अलिबाग : जिमाका – जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 21 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे. जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या 1 मार्च ते 21 मे – 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या-1 …
Read More »पेणमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार
पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यातील महिला फिर्यादी (रा. महाडिकवाडी) हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी (रा. रोडे काश्मिरे) याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माहिती अशी कि, दिनांक 11 मार्च 2020 ते दि.19 मे 2020 दरम्यान आरोपी (रा.रोडे काश्मिरे ता.पेण) याने 11 मार्चपासून महिला फिर्यादी (रा.महाडीकवाडी ता.पेण) …
Read More »भेंडखळच्या पेट्रोल पंपावरील मॅनेजरला कोरोनाची लागण
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोप्रोली-नवघर महामार्गावरील भेंडखळ येथील जीडीएल गोदामांजवळील द्रोणागिरी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने तेथे काम करीत असलेल्या कर्मचार्यांमध्ये मोठ्या खळबळ निर्माण झाली होती. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे हा द्रोणागिरी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता. पनवेल येथून भेंडखळ …
Read More »तळोजा येथील कारखान्याला आग
पनवेल : वार्ताहर, कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दिप केमिकल्स ऑरगॅनिक कारखान्याला गुरुवारी (दि. 21) दुपारी अचानकपणे आग लागल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दप केमिकल्स ऑरगॅनिक या कारखान्याला गुरुवारी अचानकपणे आग लागल्याची माहिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper