Breaking News

Ankit Shah

सायबर गुन्ह्यांच्या तपासाला येणार वेग

नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्पाचे मुख्यालय नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होणार्‍या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या मुख्यालयासाठी नवी मुंबईतील महापे औद्योगिक विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमधील जागा आता ताब्यात मिळाली. या ठिकाणी ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मुख्यालय उभारण्यात येणार …

Read More »

‘नमन’ लोककलेला राजाश्रयाची गरज

कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यात सिंधदुर्गातील दशावतार असेल किंवा रत्नागिरी-रायगडमधील नमन, जाखडी. आजही कोकणातील मंडळींनी या लोककला जपल्या आहेत, पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी नाही. नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खर्‍या अर्थाने गरज आहे. मुंबईतील …

Read More »

मराठीची हेळसांड थांबेल

ज्यांची मातृभाषा मराठी खेरीज अन्य एखादी भाषा आहे, अशा विद्यार्थ्यांना मराठी या विषयात कमी गुण मिळतात, त्याचा परिणाम त्यांच्या एकूण गुणांवर होतो व आजच्या टोकाच्या स्पर्धेच्या दिवसांमध्ये मराठी भाषेमुळे आपला पाल्य मागे पडतो आहे हे बिगरमराठी समाजातील पालकांच्या पचनी पडत नाही. त्यावर तोडगा म्हणून लहानपणापासून आपल्या पाल्याला तो राहात असलेल्या …

Read More »

अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण

नागोठणे : प्रतिनिधी – सहकार खात्याच्या रोहे येथील दुय्यम निबंधकांच्या  आदेशानुसार नागोठणे येथील अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने केएमजी विभागात वृक्षारोपण  मोहीम राबवण्यात आली. जि. प. सदस्य नरेंद्र जैन, संस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, भाई टके, ग्रा. पं. सदस्य अतुल काळे, अखलाक पानसरे, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टके, किशोर …

Read More »

अलिबाग तालुक्यातील सराई येथील डोंगरावर वृक्ष लागवड

रेवदंडा : प्रतिनिधी – मुंबई-सायन येथील गुरूनानक महाविद्यालयाचे एनएनएस युनिट आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील सराई येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.  गुरूनानक कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी श्रमदानातून 5550 वृक्ष लागवडीचा तसेच वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. अलिबागचे वनअधिकारी विकास तरसे, सामाजिक कार्यकर्त्या लतिका दातार, गुरूनानक महाविद्यालयाचे राष्ट्रीय …

Read More »

महामार्गावर पडलेल्या गंधकाने घेतला पेट

महाड : प्रतिनिधी – मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ रसायन घेऊन जाणारा ट्रक जून महिन्यात पलटी झाला होता. त्यावेळी ट्रकमधील गंधकाची पावडर रस्त्यालगत पसरली होती. या घटनेला महिना उलटला तरीही हे गंधक काढण्यात आले नव्हते. या गंधक पावडरने रविवारी (दि. 21) अचानक पेट घेतला. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. …

Read More »

प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांविनाच!

पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णांचे उपचारासाठी हेलपाटे पोलादपूर : शैलेश पालकर – रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या पोलादपूर तालुक्यातील पिंपळवाडी आणि पळचिल या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांचीदेखील बदली झाली आहे. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी हेलपाटे मारावे लागत …

Read More »

चालत्या दुचाकीवर विजेची तार पडल्याने एकजण जखमी

उरण : वार्ताहर  – चालत्या दुचाकीवर उच्च दाबाची वीज वाहिनी पडून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) उरण तालुक्यात फुंडे गावाजवळ डोंगरी रोड कॉर्नरजवळ घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीस्वार मात्र जखमी झाला आहे. उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील  दांडा गावातील तरुण दिनेश जीवन पाटील …

Read More »

कळंबोली येथील उद्यानाची दुरवस्था ठेकेदाराचा हलगर्जीपणा

कळंबोली : प्रतिनिधी  – कळंबोली वसाहतीतील सेक्टर 2 मधील उद्यानाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, उद्यानात सडलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. मच्छरचे वाढते प्रमाण व रोगराईच्या भीतीने नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले एकमेव पे अ‍ॅण्ड पार्क उद्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले …

Read More »

रसायनीतील एड्स समुपदेशन कार्यालयाला एचओसीकडून टाळे

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त  –  श्री समर्थ सामाजिक संस्थेंतर्गत रसायनी परिसरातील एड्स आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणात राहावे या उद्देशाने एड्स समुपदेशन व आधार केंद्र गेली 10 वर्ष एचओसी गेस्ट हाऊस येथील कंपनीच्या बंगला न. सीटी 4 येथे सुरू आहे. रसायनीप्रमाणे कर्जत, खालापूर, पनवेल, उरण अशा चार तालुक्यांतील शेकडो एड्स रुग्णांमध्ये …

Read More »