पनवेल ः प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएलने जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांमधील मुलींना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आजच्या काळात मुलींच्या सक्षमतेसाठी अतिशय आवश्यक असा हा समाजोपयोगी उपक्रम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने राबविला जाणार आहे. जमशेदपूर येथे आशिया खंडातील पहिल्या स्टील प्रकल्पाच्या उभारणीत ज्यांनी …
Read More »बलात्कारी राम राहीमला दणका
हायकोर्टाने फेटाळला पॅरोल चंदीगड ः वृत्तसंस्था डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कारप्रकरणी सध्या तुरुंगात असून त्याचा पॅरोल पंजाब व हरियाणा हायकोर्टाने मंगळवारी (दि. 27) फेटाळला आहे. राम राहीमच्या पत्नीने पॅरोल अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे. …
Read More »मोदी सरकारचा बिग प्लॅन!
10 वर्षांत शेतकर्यांना होणार मोठा फायदा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने एक अशी योजना आणणार आहे ज्यामुळे पुढील 10 वर्षांत देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन शेतीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जवळपास 75 लाख लोकांना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. …
Read More »अनिवासी भारतीयांशी विवाह करताना ‘सावधान’
पंजाबमध्ये जुलैमध्ये अनिवासी भारतीय विवाह आणि त्यातील समस्या या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. परदेशात राहणारा नवरा मिळणं ही खास आनंदाची व प्रतिष्ठेची बाब समजली जात असल्याने परदेशातली नोकरी आणि तिथल्या उच्चभ्रू जीवनशैलीची भुरळ पडूनच परदेशस्थ मुलाला लगेच होकार दिला जातो. घाईगडबडीने लग्न केले जाते. या वेळी विवाहापूर्वी …
Read More »पुन्हा एकदा मोदी मॅजिक
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सार्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे भारताच्या विरोधात आगपाखड केली असून अणुयुद्धाचा गर्भित इशारा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरातील सारे महत्त्वाचे देश भारताच्या बाजूने अभे राहात असल्याचे स्पष्ट दिसू लागल्याने खान यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. फ्रान्सच्या बिआरित्झ शहरात जी-7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान …
Read More »शिवराज प्रतिष्ठानकडून पूरबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
उरण ः प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवराज प्रतिष्ठान उरणतर्फे सुमारे 100 पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी वह्या, पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य करवीर तालुक्यातील चिखली, भुये, शिये, वरगणे, पाडली या गावातील शाळांना वाटप करण्यात आले. शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश ठाकूर यांच्या हस्ते ते पूरग्रस्त भागात पाठविण्यात आले. या वेळी खजिनदार उमेश वैवडे, विश्वस्त …
Read More »भाजप रायगड अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीसपदी रय्यान तुंगेकर
उरण ः वार्ताहर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीसपदी रय्यान अन्वर तुंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी दिले. या वेळी भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष शहानवाज मुकादम, नवघर जिल्हा …
Read More »जांभिवलीतील शेकाप, शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलनात भाजपचे चौक पंचायत समिती विभाग अध्यक्ष काशिनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली जांभिवली (चौक) येथील शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण …
Read More »मुस्लीम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी कामोठेत जागा देणार
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे, कळंबोलीतील मुस्लीम समाजाची अडचण लक्षात घेता लवकरच न्यासाची मागणी पूर्ण होईल व सर्व मुस्लीम बांधवाना नमाज अदा करण्यासाठी पर्यायी जागा किंवा स्वतःच्या हक्काच्या मालकीचा भूखंड मिळेल, असे आश्वासन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले आहे. आमदार प्रशांत …
Read More »उरण देऊळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन्मानित
उरण ः वार्ताहर पोलीस आयुक्त परिमंडळ-2 पनवेल विभागातून विघ्नहर्ता 2018चा सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचा प्रथम क्रमांकाचा मान उरण शहरातील देऊळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मिळाला. पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रक देऊन या मंडळाला गौरविण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव विघ्नहर्ता 2018 पुरस्कार वितरण सोहळा नुकताच नवी मुंबईतील वाशी-सिडको ऑडिटोरिअम येथे झाला. राष्ट्रीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper