एखादे काम करायचे असेल तर त्याला सतत पाठपुरावा आणि मानसिकता आवश्यक असते. त्याच अनुषंगाने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले उरणकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम भाजप नेते महेश बालदी यांनी पूर्ण करून आता उरणला स्मार्ट करण्याचा दृढनिश्चय केला आहे. प्रोटॉन कधीही आपली सकारात्मकता गमावत नाही, त्याचप्रमाणे उरणच्या विकासासाठी महेश बालदी प्रोटॉन आहेत, …
Read More »नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्यांनी भविष्यात होणार्या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक …
Read More »जलस्रोतांचे नियोजन हवे
उत्तरेकडील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते, तर पश्चिम किनारपट्टीवरही जोरदार पाऊस कोसळतो. परंतु देशाच्या दक्षिणेकडील उर्वरित भागात पाऊस यथातथाच होतो. अत्यल्प पावसामुळे या परिसरात पावसाळा संपताच लगेचच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे यंदा तर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनावरच मोठा परिणाम झाला. यंदाही राज्यात नेहमीप्रमाणे निरनिराळ्या …
Read More »खालापूर येथे राष्ट्रीय लोकअदालत
खोपोली ः प्रतिनिधी – खालापूर दिवाणी न्यायालय क स्तर तालुका विधी सेवा समिती अंतर्गत शनिवारी 13 जुलै रोजी खालापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात खालापूर तालुक्यातील एकूण 44 ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपालिका, महावितरण, बीएसएनएल व विविध बँका …
Read More »पालकमंत्र्यांच्या हस्ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वास्तूचे उद्घाटन
माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) करण्यात आले. माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालय …
Read More »‘माथेरानचा शारलोट तलाव गाळमुक्त करा’
कर्जत ः बातमीदार – माथेरानकरांची व येथे आलेल्या पर्यटकांची तहान भागवणारा महत्त्वपूर्ण ब्रिटिशकालीन तलाव गेली पाच वर्षे साफ करून गाळमुक्त केला नसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तो गाळ काढून हा तलाव गाळमुक्त करून नागरिकांना व पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या, अशी मागणी येथील स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली आहे. माथेरान …
Read More »तक्रार
पनवेल एसटी स्टँड. सकाळची वेळ. दुसर्या दिवशी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणार्यांची मोठी गर्दी होती. मुंबई, ठाणे, बोरिवली आणि पालघरकडून पंढरपूरला जाणार्या गाड्या येत होत्या, पण त्यात बसायला जागा नसल्याने कोणी गाडीत चढत नव्हते. एक पाच-सहा मध्यमवयीन व्यक्तींचा ग्रुप आला. त्यांनाही पंढरपूरला जायचे होते. पनवेलहून सुटणारी गाडी आता नसल्याचे समजल्याने त्यांनी …
Read More »बिबट्याच्या तावडीतून सुटका अन्
जिल्ह्यातील मुरबाड या कर्जत तालुक्याला लागून असलेल्या तालुक्यातील करपटवाडीची ओळख मागील काही दिवसांत जगाला झाली आहे. या वाडीमधील आदिवासी कुटुंबातील चार सदस्यांवर जंगलात बिबट्याने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपल्या म्हातार्या आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचे काम करणार्या त्या दोन बालकांना शौर्य पुरस्कार द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. कर्जत …
Read More »कोकणाला अच्छे दिन
मोदी सरकार केंद्रामध्ये दुसर्यांदा सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले आणि पुन्हा एकदा पाच वर्षांच्या यशस्वितेनंतर निवडणुकीला सामोरे जात आहे. विठ्ठलाची पूजा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्रीही मीच असेन, असे आत्मविश्वासाने सांगितले. सरकारने केलेल्या कामाबद्दल त्यांना विश्वास आहे. सबका विकास हे ध्येय सरकारने समोर ठेवले. कोकणालाही यामुळे …
Read More »‘त्सुनामी’नंतरचे धक्के
‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीचा प्रत्यय सध्या काँग्रेससह विरोधी पक्षांना येत आहे. कर्नाटकात जेडीएस, काँग्रेस, अपक्ष आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केले असतानाच शेजारील राज्य गोव्यात काँग्रेसच्या 10 आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला जोरदार झटका बसला आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणार्या काँग्रेसला त्यानंतरही सातत्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper