पनवेल ः प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने रसायनीजवळील कष्टकरीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 22) शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकार म्हणून सामाजिक हित जपणे आमची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पनवेल …
Read More »साई गावातील बससेवा पूर्ववत सुरू
उरण ः प्रतिनिधी : पूर्वापार सुरू असलेली साई-पनवेल ही एसटी बस मागील वर्षी 1 एप्रिल 2018 रोजी साई गावात येणे बंद करण्यात आले होते, पण साई गावातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून ही एसटी बससेवा काल रात्रीपासून उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते साई गावातील एसटी बस स्टँड येथे बसला पुष्पहार …
Read More »आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडून वाशीतील धोकादायक इमारतींची पाहणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी : वाशी सेक्टर- 9 येथील जे. एन. टाईप सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींवर शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी माहितीच्या मुद्यावर सभागृहात निवेदन करून तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून सदर कारवाईला तत्काळ स्थगिती मिळविली होती. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी …
Read More »विजेच्या लपंडावाने हैराण नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
उरण ः प्रतिनिधी : विजेच्या लपंडावाने संपूर्ण उरण तालुक्याला अक्षरशः हैराण केले असून, पाऊस पडत नसल्याने उष्ण हवामानाने नागरिकांची झोप उडाली आहे. सतत आठ दिवस विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनता उष्म्याने होरपळून निघत आहे. त्यातच अधूनमधून वीजपुरवठा पूर्ववत होत असतानाच अचानकपणे उरण-बोरी नाका येथील ट्रान्सफार्मरचा स्फोट झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी रात्रीच्या …
Read More »सीकेटी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन
पनवेल ः प्रतिनिधी : सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेदतर्फे विद्यालयात विशेष योगशिक्षिका नयना म्हात्रे उपस्थित होत्या. योग केंद्राच्या विद्यार्थिनी वैष्णवी जगे आणि हर्षा शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रशिक्षिका नयना म्हात्रे यांनी …
Read More »सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योगदिन साजरा
पनवेल ः प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, तसेच सुशील शर्मा, हॅप्पी सिंग, कमलाकर पाटील, रश्मी भारद्वाज, रेखा रावत, सुनीता शर्मा, काटकर सर, नाईक सर, म्हात्रे …
Read More »सीकेटी महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. एन. सी. सी. विभागातर्फे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेचे प्रमुख व एन. …
Read More »टीआयपीएलतर्फे ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त : महाराष्ट्र राज्य वाहतूक शाखेकडून सुरक्षित प्रवासासाठी ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंंतर्गत टीआयपीएल कंपनीतर्फे पाडेघर येथील प्रवेशद्वारापाशी गुरुवारी (दि 20) दुपारी अभियानाला सुरुवात झाली. या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक विभागाचे सहा. आयुक्त राजेंद्र चव्हाण, इन्स्पेक्टर पराग सोनावणे यांच्या हस्ते झाले. यावेळी टीआयपीएलचे …
Read More »करियरच्या वाटा या विषयावर मार्गदर्शन
पनवेल : बातमीदार : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व शांतिनिकेतन तंत्रनिकेतन नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने इ. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षणामधील विविध शाखांतील करियरच्या उपलब्ध संधी आणि तंत्र शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया या विषयासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी करियरच्या वाटा हा कार्यक्रम आयोजित …
Read More »राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत पायल डान्स अॅकॅडमीचे सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त : ऑल इंडिया आर्टिस्ट असोसिएशनच्या 6 ते 10 जून दरम्यान शिमला, हिमाचल प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील नाटक आणि नृत्य स्पर्धेत 64 जणांचा गट सहभागी झाला होता. या स्पर्धेत पायल डान्स अॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पनवेलमधील कर्नाटक संघ हॉलमध्ये बुधवारी (दि. 19) प्रमाणपत्राचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper