Breaking News

Ankit Shah

पोलिसांतील माणुसकी अपंगाला दिले जीवनदान

रेवदंडा : प्रतिनिधी  : कोर्लईनजीक पेट्रोल पंपासमोरील समुद्रलगतच्या खडकावर  झोपलेल्या त्याच्या अंगाला पाणी लागले म्हणून त्याला जाग आली, तेंव्हा चारही बाजूने पाण्याने वेढल्याचे त्याच्या लक्षात आले. अपंग असल्याने त्याला फारशी हालचाल करता येत नव्हती, रात्रीचे जागरण, व जेवणही मिळाले नसल्याने शरिर अगदीच क्षीण झाले होते. मात्र पुढ्यात काळ येऊन ठेपल्याची …

Read More »

मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास प्रारंभ

मुरुड : प्रतिनिधी : मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास मंगळवार (दि. 21) पासून सुरुवात झाली आहे. सुमारे 7 कोटी रुपयांच्या या कामाची सुरुवात कोटेश्वरी मंदिरापासून करण्यात आली. सध्या असलेल्या रस्त्यावर कार्पेट टाकण्याचे काम सुरु आहे. कोटेश्वरी मंदिरापासून नवाबाच्या राजवाड्याच्या पुढे सदरचे  काम करण्यात येणार आहे. पावसाळा जवळ आला असून, तत्पुर्वी …

Read More »

पर्यटकांच्या साक्षीने माथेरानचा वाढदिवस साजरा

कर्जत : बातमीदार : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून, या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) पर्यटकांनी भरगच्च भरलेल्या नौरोजी उद्यानात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरान उदयास आणले होते. या पार्श्वभूमीवर येथील नौरोजी लॉर्ड उद्यानात माथेरान गिरीस्थान …

Read More »

विंचूदंश विषयक सूचनांचे पालन होण्याची गरज

पोलादपूर तालुक्यात भातशेतीची कापणी सुरू झाली असताना विंचूदंशाने बाधित रूग्णांची संख्या वाढली असून पावसाळयापूवीर अनेक रूग्ण ग्रामीण रूग्णालयामध्ये होत असतात. दरम्यान, महाड येथील जागतिक किर्तीचे विंचूदंश उपचारपध्दतीचे संशोधक डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी दिलेल्या सूचनांचे पोलादपूरच्या ग्रामीण भागात पालन होण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यात कार्तिकी एकादशीपूर्वीच भातशेती कापणीला सुरूवात झाली …

Read More »

विरोधकांचा रडीचा डाव

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील मतपावत्यांची मोजणी करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिला. मात्र त्यानंतरही विरोधकांनी आपली व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीची मागणी अखेरपर्यंत लावून धरली. मतमोजणीच्या आधी मतपावत्या पडताळल्या जाव्यात ही विरोधकांची मागणीही आयोगाने अखेर बुधवारी फेटाळून लावली. भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

नवी मुंबईतील नागरी समस्यांवर चर्चा

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट नवी मुंबई : प्रतिनिधी  : नवी मुंबईतील विविध नागरी समस्या, तसेच प्रलंबित अनेक विषयांसंदर्भात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत न्यू पामबीच सोसायटीतील घरांना कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तेथील प्रवेशद्वारासमोर …

Read More »

खाजगी अवैध सार्वजनिक वाहतुकीने व्यवस्थ धोक्यात

सुट्ट्या लागल्याने आणि लग्नसराई असल्याने खाजगी वाहनांना सोन्याचे  दिवस आले आहेत. मात्र वाटेल ती किमंत सांगून प्रवाशांना लुटण्याचे काम सध्या खाजगी वाहतूक करणार्‍या चालकांकडून केले जात आहे. शिवाय अनेक गाड्या या विनापरवाना प्रवासी वाहतूक करत आहेत. या अवैध खाजगी प्रवासी वाहतुकीवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा मात्र सपशेल कानाडोळा होत …

Read More »

एनडीएच्या विजयाचा बिगुल

बहुमतासाठीचा 272 जागांचा पल्ला एनडीए पार करील असे यापैकी बहुसंख्य चाचण्यांमधून सुचवण्यात आले आहे. निवडणुकांच्या निकालांनंतर दिल्लीत अस्थिरता निर्माण होईल असे गृहित धरून चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने नुकत्याच शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या आहेत. मायावती, अखिलेश यादव यांनाही ते भेटले. परंतु भाजपप्रणित एनडीएला 275 ते …

Read More »

नगर परिषद आज साजरा करणार माथेरानचा वाढदिवस

कर्जत : बातमीदार : पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचा वाढदिवस मंगळवारी (दि. 21) नगर परिषदेतर्फे साजरा होणार आहे. पर्यटकांना या वाढदिवसाचे साक्षीदार होण्याचा मान मिळणार आहे. ठाण्याचे तत्कालीन इंग्रज कलेक्टर एच. पी. मॅलेट यांनी 21 मे 1850 रोजी माथेरानचा शोध लावला होता. त्यास 169 वर्षे होत असून, हा वाढदिवस नगर …

Read More »

आगरकोट किल्ल्याला उर्जितावस्था

सह्याद्री प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम; 34 तोफा दगडी चौथर्‍यांवर अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी : दुर्गसंवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने रेवदंडायेथील आगरकोट किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत तेथील तोफा व्यवस्थित रचून ठेवल्या. संस्थेच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून रेवदंडा येथील आगरकोट …

Read More »