Breaking News

Ankit Shah

उपासमारीने महाडमध्ये मगरीचा मृत्यू?

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील कोल गावाजवळ बुधवारी (दि. 13) दुपारी पाण्याच्या डबक्यात एक मगर मृतावस्थेत आढळली. नदी आणि साचलेले पाणी कमी होऊ लागल्याने आणि याठिकाणी खाण्याचे स्रोत कमी झाल्याने भूकबळीमुळे या मगरीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. मात्र कोणत्यातरी अज्ञात कारणाने किंवा नैसर्गिक कारणास्तव गेल्या …

Read More »

अत्याचारप्रकरणी सावत्र पित्याला आजन्म कारावास

अलिबाग : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र पित्याला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावली. सगीर मोहम्मद खान असे या आरोपीचे नाव असून हा खालापूर तालुक्यातील आहे. त्याने 15 फेब्रुवारी 2015 ते 25 जून 2016 या कालावधीत या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार …

Read More »

गावाला अडचण ठरणार्या ट्रान्स्फॉर्मरची जागा बदलावी

नागोठणे : प्रतिनिधी : विभागातील पळस या गावाला विद्युत पुरवठा करणारा रोहित्र अर्थात ट्रान्स्फॉर्मर गावासमोरील महामार्गाच्या पलिकडे असून सध्या बाजूच्या भरावामुळे हा ट्रान्स्फॉर्मर खोल खड्ड्यात गेला आहे. पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विद्युत वितरणच्या कर्मचार्‍याला येथे जाणे त्रासदायक होत आहे. महामार्ग खाते, संबंधित ठेकेदार आणि विद्युत मंडळाने समन्वय साधून हा …

Read More »

कर्जत दहिवली येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण

कर्जत : बातमीदार : मंगल रमेश नायडू (वय 13) या मुलाला दहिवली येथून शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने अरुण कांबरी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या राखवालीतून पळवून नेल्याने कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. जी. देठे करीत आहे. मंगल नायडू याची उंची 141 सेंमी, रंग सावळा, …

Read More »

निवडणुकीत तळीरामांवर करडी नजर

जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात दारू विक्री करणार्‍या दुकानांवर तसेच मद्य उत्पादन करणार्‍या कंपन्यांवर  निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. दुकानांची दररोज तपासणी केली जाणार आहे. मद्य विक्रीत अचानक वाढ झाली तर त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. दारू विक्रीत अचानक झालेल्या वाढीचे …

Read More »

आरोग्य संदेशासाठी सायकलवरून 1355 किमीचा प्रवास

पुणे ः प्रतिनिधी :  आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनील कुकडे यांनी सायकलवरून पुणे ते विषाखापट्टणमपर्यंत 1355 किलोमीटरचा प्रवास केला. दररोज 200 किलोमीटर सायकलिंग करून हा प्रवास 70 तासांमध्ये पूर्ण केला. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. एकट्याने हा संपूर्ण प्रवास केला असून, यातून त्यांना आरोग्याचा …

Read More »

दहशतवादी हल्ले करणारा पाक मोकाट कसा?

बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. मसूदच्या विरोधात मत न देऊन चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी …

Read More »

झटपट श्रीमंत होण्यासाठी केल्या 50 घरफोड्या

पुणे ः प्रतिनिधी : झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या अधिकार्‍यांनी जेरबंद केले आहे. सुनील तलवारे असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने आतापर्यंत 50 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे 5 लाख 13 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी …

Read More »

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

मुंबई ः प्रतिनिधी :  अंधेरीत एका 60 वर्षीय महिलेला आक्षेपार्ह फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करून 12 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून फिर्यादी असलेल्या वृद्ध महिलेची एका तरुणाशी ओळख झाली होती. या प्रकरणी दुबईत राहणार्‍या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात …

Read More »

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष; तीन पोलीस निलंबित

पुणे ः प्रतिनिधी : अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणे ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे़. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीरद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़. सी़. बेंद्रे …

Read More »