ग्रामीण भागातील 50 टक्के घरं कुलूपबंद गड्या आपला गाव बरा असं म्हणणारी पिढी आता दुर्मिळ होऊन बसली आहे. पोटासाठी गाव सोडून गेलेले गावाकडे येण्यास तयार नाहीत. तरुणांची मोठी फौज शहराकडे गेली आणि गावात उरले ते फक्त वयोवृद्ध. या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील 50 टक्केहून अधिक घरांना कुलपे लागली आहेत. एकेकाळी गजबजलेली …
Read More »घराचे स्वप्न आवाक्यात
मुंबई शहरातच नव्हे तर ठाण्यापासून थेट बदलापूरपर्यंत सगळीकडेच अशा अडून राहिलेेल्या प्रकल्पांची व ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांची संख्या सध्या मोठी आहे. आता जीएसटी दरात तब्बल सात टक्क्यांची मोठी घट झाल्याने ग्राहक या घरांच्या खरेदीकडे वळतील अशी आशा जागी होऊन विकसकांवरील ताण काहीसा दूर झाला आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणार्या मध्यमवर्गीयांना …
Read More »वाहन नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी
पेण : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार आता 1 मार्चपासून ऑटो रिक्षासह सर्व परिवहन संवर्गातील वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनीwww.parivahan.gov.in या प्रणालीवर जाऊन ऑनलाईन पेमेंटद्वारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क भरावे व निर्धारित दिवशी निर्धारित वेळी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी खटला विभागातील ना हरकत शेरा घेऊन वाहन …
Read More »वणवे रोखण्याची जबाबदारी महत्वाची -अभिनेत्री शुभांगी गोखले
कर्जत : बातमीदार वणवे लागून जंगलातील वनसंपदा नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी सामाजिक भान राखत सगुणा वनसंवर्धन समिती वणवे रोखण्याची जबाबदारी काही प्रमाणात पार पाडत आहे. अशी जबाबदारी समाजातील सर्वांनी उचलायला हवी, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी येथे व्यक्त केले. सगुणा रुरल फाऊंडेशन व वनविभाग यांच्या …
Read More »खालापुरातील वृक्षदूत रामदास काईनकर याचा वृक्ष जगवण्यासाठी धडपडीतून नवा प्रयोग
खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यात सर्वत्र वृक्षारोपणाची मोहीम राबवून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते, मात्र त्यानंतर वृक्ष संगोपनाबाबत उदासीनता दिसून येते. खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी गावातील तरुण रामदास कमलाकर काईनकर याची वृक्ष जगविण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. रामदास काईनकर मातीशी नाळ जुळलेला तरुण. तो वीटभट्टी व्यावसायिक आहे, म्हणून मातीशीच नाही, तर पर्यावरणाप्रतिही …
Read More »कर्जतमध्ये भगवा फडकला
राष्ट्रवादी, शेकापला तडाखा; आठपैकी थेट सरपंचपदावर सेनेचे सहा उमेदवार विजयी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 25) झालेल्या मतमोजणीत आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी आणि शेकापला प्रत्येकी एक सरपंचपद मिळाले आहे. तालुक्यातील ममदापूर, चिंचवली, …
Read More »थोर पुरुषांची शिकवण आचरणात आणा -नगराध्यक्षा प्रीतम पाटील
पेण : प्रतिनिधी थोर पुरुषांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण केल्यास समाजात एकोपा व शांतता निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांचा आदर्श आपण अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नुकतेच येथे केले. पेण नगर परिषद हद्दीतील संत शिरोमणी रोहिदासनगर येथील हायमास्ट दिव्याचे लोकार्पण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार …
Read More »कर्जत पं.स.कडून दिव्यांगांची हेळसांड
कर्जत : बातमीदार दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांंतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत, मात्र कर्जतमध्ये घेण्यात आलेले शिबिर तालुक्यातील अपंग बांधवांसाठी डोकेदुखीच ठरले. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका अपंग बांधवांना बसला. त्यामुळे हे शिबिर गोंधळ शिबिर ठरले आहे.राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी 26 …
Read More »रोह्यात प्रवासी जनजागृती अभियान
रोहे : प्रतिनिधी कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कुसुमताई कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच प्रवासी जनजागृती अभियान राबविण्यात आले.रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दलाचे निरीक्षक सतीश विधाते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात …
Read More »पोलादपूरमध्ये झाली पंतप्रधान किसान सन्मान योजनेची ‘मन की बात’
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील 32 टक्के शेतकर्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यश आल्याने रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका दुसर्या स्थानावर असल्याची माहिती नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. येथील तहसील, तालुका कृषी आणि पंचायत समिती कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी (दि. 24) पोलादपूरमधील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये पंतप्रधान किसान सन्मान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper