Breaking News

Ankit Shah

देशद्रोहाचा फेरविचार

भारताला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे उलटली. तथापि, भारतीय दंडसंहितेतील 124 (अ) हे देशद्रोहाबाबतचे कलम अजुनही वापरले जाते. गेल्या 75 वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु ब्रिटिश राजवटीतील देशद्रोहाबाबतचा हा कायदा बदलण्याचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. आता मात्र केंद्रातील मोदी सरकारने या कायद्यातील जाचक तरतुदींमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने फेरविचार …

Read More »

काँग्रेसमधील खदखद

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे, मात्र काही ना काही  कारणांवरून या आघाडी सरकारमध्ये धुसफूस दिसून येते. एकेक राज्य काँग्रेसच्या हातून निसटून जात असताना या पक्षाने विचारधारा, ध्येय-धोरणे बाजूला सारून महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेचा वाटा स्वीकारला, मात्र इथेही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. …

Read More »

कळमजे नदीवरील पूल धोकादायक

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणारे वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत हा पूल कमकुवत असल्याने शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. ही वाहतूक रत्नागिरी, महाड, माणगाव बाजू …

Read More »

जंजिर्‍यावर पर्यटकांसाठी जेट्टीची गरज

किल्ल्याचा चढ-उतार सुलभ होण्यासाठी मागणी मुरूड : प्रतिनिधी  मुरूड राजपुरी येथे असणारा जंजिरा किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा किल्ला आहे. दरवर्षी हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागामधून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. 13 शिडाच्या होड्या तर दोन मशीन बोटीद्वारे या किल्ल्यावर पर्यटकांना पोहचवण्याचे काम केले जाते. किल्ल्यावर …

Read More »

महाड भाजप महिला मोर्चातर्फे मातृदिनानिमित्त पोषण आहार वाटप

महाड : प्रतिनिधी जागतिक मातृदिनाचे औचित्य साधुन रविवारी (दि. 8) महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने आदिवाडीवरील मातांना पोषण आहार वाटप करण्यात आला. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आदिवाड्यावरील माता आणि बालकांना आजही पोषण आणि संतुलीत आहार मिळत नाही. आदिवासींच्या वाट्याचे अन्न धान्य मोठ्याप्रमाणात काळ्या …

Read More »

महाडमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त

चार जणांना अटक महाड : प्रतिनिधी  महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर आणि बिरवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त करण्यात आला. त्याच बरोबर चार …

Read More »

सुखम हॉस्पिटलचा दशकपूर्ती सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुखम हॉस्पिटलला दहा वर्षे पूर्ण झाली असून हॉस्पिटलने 11व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दशकपुर्ती सोहळा शुक्रवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला होता. या निमित्त विविध सांस्कृतीक, कार्यक्रम तसेच कोरोना योद्धांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना गव्हाण विद्यालय व कॉलेजमध्ये अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व  ज. आ. भगत जु. कॉलेज व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिक्षणाचा वारसा जपणारे व महान समाजसेवक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत साहेबांची 34वी …

Read More »

जनार्दन भगत यांचा वारसा सर्वांनी पुढे चालवूया -लोकनेते रामशेठ ठाकूर

पुण्यतिथीनिमित्त शेलघर येथे अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी माणसे जोडण्याचे काम त्यांनी केले आणि तोच वारसा आपण सर्वांनी पुढे चालवावा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) शेलघर येथे केले. कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते आणि थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची 34 …

Read More »

एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळून जाणार्‍या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री अपरात्री वाहनचालकांना धाक दाखवून दरोडा व जबरी चोरी करणार्‍या एका टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने गजाआड केले आहे. या टोळीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत साजिद कयूम अन्सारी (वय 30) टँकर …

Read More »