Breaking News

Ramprahar News Team

खारघर हिल पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद राहणार

खारघर : प्रतिनिधी पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणार्‍या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे, मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी येथील गावकर्‍यांना यामधून सूट असणार आहे. खारघर सिडकोने …

Read More »

नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने व्हावीत ; ब्रिजेश पटेल यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त सध्या पावसाळा सुरू झाला असून शहरामध्ये पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या गटारांची साफसफाई सुरू आहे. ती योग्यप्रकारे केली जात नाही अशा तक्रारी अनेक सेक्टरमधून भाजप संपर्क कार्यालयाला मिळाल्या आहेत. खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी याबाबतचे एक निवेदन सिडकोचे खारघर नोड अधीक्षक अभियंता श्री. …

Read More »

सरसगडाने घेतला मोकळा श्वास ; ट्रेकिंग पलटन ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम फत्ते

पाली ः प्रतिनिधी ट्रेकिंग पलटन ग्रुप पुणेतर्फे सुधागड तालुक्यातील सरसगडावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी ग्रुपच्या सदस्यांनी सरसगडावरील प्लास्टिक कचरा गोळा केला. यात बाटल्या, ग्लास, फूड पॅकेट्स, पॉलिथिन बॅग असा पर्यावरणास घातक कचरा उचलून गडाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. गडकिल्ले संवर्धनासाठी दुर्गप्रेमी झपाटून काम करताना दिसत आहेत. गडकिल्लेरूपी …

Read More »

सिडकोतर्फे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

नवी मुंबई ः प्रतिनिधी सिडकोतर्फे शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे सकाळी 7 ते 9 या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटीझन्स या संस्थाचांही या योग शिबिराच्या आयोजनामध्ये सहभाग आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस …

Read More »

शिवसेनेकडून महावितरण अधिकार्यांना रॉकेलचा दिवा भेट

अलिबाग : प्रतिनिधी रायगडकर सध्या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे संतप्त झालेले लोक मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. 17) महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना रॉकेलचा दिवा भेट देऊन महावितरणचा निषेध करण्यात आला. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास …

Read More »

आदिवासी माळरानावर उभारणार नाग्या कातकरींचे स्मारक ; वनवासी कल्याण आश्रमच्या प्रयत्नांना यश

उरण ः प्रतिनिधी चिरनेर येथील आक्कादेवी माळरानावर 25 सप्टेंबर 2018 रोजी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपस्थित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील व रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांनी नाग्याबाबांच्या स्मारकासाठी प्रयत्न …

Read More »

खारघरमध्ये कमी दाबाने पाणी

खारघर : प्रतिनिधी सिडकोच्या मालकीच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला बिघाड झाल्याने खारघर शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून खंडित झाला आहे. तीन दिवस उलटूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खारघरसह उलवे, द्रोणागिरी नोडमध्ये हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग …

Read More »

गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ सोहळा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. 17) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व …

Read More »

40 हजाराच्या दुचाकीची चोरी

पनवेल : नवीन पनवेल येथील निल हॉस्पीटलच्या पाठीमागील गल्लीतील रस्त्यावर लावलेल्या 40 हजार रुपये किमतीच्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश अनिल गोवळकर (21 वर्षे) हा विचुंबे येथे राहत असून पनवेल येथील पुरी कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. टीव्हीएस अ‍ॅन्टॉक कंपनीची …

Read More »

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी ‘मिशन सलामती’

पनवेल : बातमीदार रस्ता सुरक्षेबाबत युवा संस्था व एग्झोनोबल कंपनीच्या वतीने राबविण्यात येणारा ’मिशन सलामती’ हा विशेष कार्यक्रम या वर्षातदेखील राबविण्याचा निर्धार युवा संस्था आणि एग्झोनोबल कंपनीच्या प्रतिनिधींनी केला आहे. गुरुवारी खारघर येथील युवा सेंटरमध्ये पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात याबाबतची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल वाहतूक …

Read More »