लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संघातील मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी झुंजार कामगिरी करण्यास तयार राहावे, अशी सूचना केली आहे ती भारताचा कर्णधार विराट कोहलीने. शनिवारी पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत भारतीय संघाचा डाव 179 धावांत 39.2 षटकांत आटोपला. या पार्श्वभूमीवर …
Read More »माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी; पार्किंग फुल्ल
कर्जत ः प्रतिनिधी माथेरानमधील पर्यटन हंगाम लक्षात घेता पर्यटक माथेरानला पहिली पसंती देताना दिसत आहेत. येथे शनिवारी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे येथील एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते. येथे 600 वाहनक्षमता असलेल्या वाहनतळावर शनिवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने वन व्यवस्थापन समितीचे एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते. एप्रिल-मे महिन्यात तीन …
Read More »जिल्हा परिषद शिक्षकाची उत्तुंग भरारी ; जगदिश ऐनकर शास्त्रीय संगीत परीक्षेत देशात प्रथम
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे प्राथमिक शाळेचे शिक्षक जगदिश ऐनकर यांनी आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. शास्त्रीय संगीतात मध्यमा परीक्षेत ऐनकर देशात प्रथम आले असून, त्यानिमित्ताने त्यांना भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले आहे. कर्जतच्या ग्रामीण भागात खांडस गावात राहणारे जगदिश ऐनकर यांनी आपले …
Read More »पॅराशूटचालकावर गुन्हा दाखल
मुरूड ः प्रतिनिधी शनिवारी पॅराशूटवर स्वार झालेले पुणे येथील पर्यटक गणेश पवार (40) आणि वेदांत पवार (15) या पितापुत्राचा मुरूड समुद्रकिनारी पॅराशूटवरून पडल्याने अपघात झाला होता. यात वेदांत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासन गतिमान झाले असून मुरूड पोलिसांनी या प्रकरणी …
Read More »संसदेचे पहिले अधिवेशन जूनमध्ये; जुलैत मांडणार देशाचा अर्थसंकल्प
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता संसदेतील नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हे अधिवेशन 5 ते 15 जून या काळात सुरू होण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात मोदी सरकार आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामधून सरकार अनेक …
Read More »हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या पार्थिवाला स्मृती इराणी यांनी दिला खांदा
अमेठी ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली होती. बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनीही येथे …
Read More »कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया शाळा एसी हॉलमध्ये दिनांक 25 आणि 26 मे रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा 2019 झाल्या. यात विविध वयोगटातील 411 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी तीन लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके आहेत. (छाया : लक्ष्मण …
Read More »‘पुढील पाच वर्षे भारतासाठी एकलव्यासारखे काम करेन’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मला विजयाचा विश्वास होता, मात्र विजय पचवण्याची क्षमता असायला पाहिजे. पुढील पाच वर्षें भारतासाठी मी एकलव्यासारखे काम करणार आहे, असे उद्गार देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातेतील अहमदाबाद येथील 50 वर्षे जुन्या भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या सभेमध्ये काढले. लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर …
Read More »पुनाळेकर, भावेला 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
पुणे ः डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे सत्र न्यायालयाने 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. दाभोळकर …
Read More »भारताविरुद्धच्या सामन्यानंतरच कुटुंबाला बोलवा -पाक क्रिकेट बोर्ड
कराची : वृत्तसंस्था वर्ल्डकपदरम्यान खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना भारताविरुद्ध होणार्या सामन्यानंतरच आपल्या कुटुंबांना इंग्लंडला बोलावण्याची परवानगी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी वर्ल्ड कपमधील लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती हे वर्ल्ड कप क्रिकेटचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper