पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात 22 लाख 54 हजार 222 मतदार असून, त्यापैकी 35 हजार 452 नवमतदार आहेत. हे युवा मतदार रायगड लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना या नवमतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी विषेश परिश्रम करावे लागणार आहेत. मतदारसंघाची एकूण लोकसंख्या 31 लाख 73 हजार 358 असून त्यामधील 18 …
Read More »हे तटकरे माझ्यासमोर काय टिकाव धरणार -अनंत गीते
माणगांव : प्रतिनिधी पराभव समोर दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूकीतून पळ काढला, तिथे हे तटकरे माझ्यासमोर काय टिकाव धरणार, अशी घणाघाती टिका महायुतीचे उमेदवार अंनत गिते यांनी बुधवारी (दि. 3) होडगांव कोंड येथील जाहीर प्रचार सभेत केली. माणगांव तालुक्यातील होडगांव कोंड येथे महायुतीचे उमेदवार …
Read More »काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल; घोषणापत्र नव्हे ‘ढकोसलापत्र’
इटानगर ः वृत्तसंस्था सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देणार्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. देशातील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणार्या, ‘जय हिंद’ऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणार्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा …
Read More »बिबट्याचा शेतकर्यावर हल्ला
आंबेगाव ः प्रतिनिधी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी (ढोबळेवाडी) येथील शेतकरी रामभाऊ नारायण ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ ढोबळे यांच्यावर सध्या पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या शेतातील दैनंदिन कामे …
Read More »वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल सभेत ‘छोटा पाकिस्तानचा’ उल्लेख
सोलापूर ः प्रतिनिधी अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या परिसरात त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत, मात्र दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या एका प्रचारसभेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर त्यांच्या समर्थकाची जीभ घसरली. सोलापूर येथील नई जिंदगी हा परिसर मुस्लीमबहुल भाग आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे समर्थक …
Read More »देहव्यापारातील विदेशी तरुणी ‘काळ्या यादीत’
नागपूर ः प्रतिनिधी शहरातील विविध भागांत दिवसेंदिवस देहव्यापार फोफावत असून आता या क्षेत्रात विदेशी तरुणींचाही शिरकाव झाला आहे. पर्यटन व्हिसाच्या नावावर देशात येणार्या विदेशी तरुणी देहव्यापार करीत असल्याची धक्कादायक बाब अनेक प्रकरणांमधून समोर आली आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी त्यांचा व्हिसा रद्द करून पुन्हा त्यांना भारताचा व्हिसा मिळणार नाही याकरिता ‘काळ्या …
Read More »वावंजे गावाजवळ महिलेची हत्या
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील वावंजे गावाजवळील हाजीमलंगच्या पायथ्याशी एका अनोळखी महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 असून, तिचा गळा ओढणीने आवळून, तसेच तीला गंभीर जखमा करून मारण्यात आले असल्याचे पोलिसांनी …
Read More »यंदाही अनधिकृत शाळांचे पेव
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने या वर्षी इंग्रजी माध्यमाच्या 14 अनधिकृत शाळांची नावे घोषित केली आहेत. या शाळा बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, महापे गाव, घणसोली, ऐरोली, रबाळे आदी परिसरात आहेत. विशेष म्हणजे या शाळांना मागील शैक्षणिक वर्षातदेखील शिक्षण अधिकारी संदीप सांगवे यांनी अनधिकृत शाळा म्हणून घोषित …
Read More »पेंधर गावात ‘देव घरा आयला’ नाट्यप्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसाद
चिरनेर : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील पेंधर येथे श्री विठ्ठल- रखुमाई उत्सव सोहळ्यानिमित्त नवी मुंबईतील नाट्य कलाकारांच्या अभिनयाने सजलेला आणि जयभवानी थिएटर्स प्रस्तुत, देव घरा आयला या आगरी-कोळी बोली भाषेतील नाट्यप्रयोग सादर झाला. त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पनवेल तालुक्यातील पेंधर गावामध्ये नवी मुंबईतील नाट्य कलाकरांनी जय भवानी थिएटर्सच्या बॅनरखाली यानित्तिाने …
Read More »ग्रंथालय प्रमाणपत्र प्रशिक्षण
उरण : रामप्रहर वृत्त येथील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात ग्रंथालय प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाविद्यालयातील महिला विकास कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन सेल, तसेच रायगड जिल्हा वाचनालय संघ व गोपाळकृष्ण वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 15 जून या कालावधीत शासन मान्यताप्राप्त हे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग विद्यार्थ्यांसाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper