Breaking News

Ramprahar News Team

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात हिंसाचाराची शक्यता ः भाजपा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये कायमच हिंसाराच्या घटना घडतात. नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारात 100 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री …

Read More »

दहावी-बारावीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका

मुंबई ः प्रतिनिधी दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणुकाच्या कामातून सुटका झाली आहे. मागील तीन दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी-बारावी बोर्डाचे काम पाहणार्‍या शिक्षकांना निवडणुकाच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी करीत होत्या. अखेर निवडणूक आयोगाच्या उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी वळवी यांनी परिपत्रक …

Read More »

एअर स्ट्राइकनंतर मृतदेह हलविले पख्तून्वाला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोट येथून खैबर पख्तून्वा येथे हलवले जात असल्याचे वृत्त काही उर्दू प्रसारमाध्यमांमध्ये दिले जात असल्याची माहिती गिलगिट येथील सामाजिक कार्यकर्ता सेनगे हसनैन सीरिंग यांनी दिली आहे. हसनैन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं …

Read More »

‘जमीन घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वड्रा यांची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात केवळ वड्राच नव्हे तर श्रीमती वड्रा आणि त्यांचे मेहुणे राहुल गांधी यांचाही समावेश आहे, किंबहुना या घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला …

Read More »

श्रीरंग बारणे पुुन्हा निवडून येतील ; शिवसेना नेते बबन पाटील यांचा विश्वास

पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे, परंतु ते नवखे उमेदवार असल्याने गेली पाच वर्षे मतदारसंघात जनतेसाठी सदैव झटणारे युतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे हेच पुन्हा निवडून येतील, असा ठाम विश्वास शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी व्यक्त केला. ते …

Read More »

‘रोटरी’तर्फे महिलांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधी महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान स्त्रीशक्तीचा या अंतर्गत रोटरी महिला सन्मान पुरस्कार 2019 वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात समाजात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रांतील एकूण 24 महिलांचा गौरव …

Read More »

करंजाडेत पाककला स्पर्धेस प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. करंजाडे नोड महिला मोर्चा अध्यक्षा अ‍ॅड. प्रमिला ढौल यांनी कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी वाशीत पासपोर्ट कार्यालय

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईकरांना गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या महत्त्वाच्या कामासाठी ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत असे. त्यामुळे अनेकांना त्रास होत होता. या अनुषंगाने वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी …

Read More »

वेश्वी येथे जलकुंभाचे भूमिपूजन

जेएनपीटी : प्रतिनिधी वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उभारण्यात येणार्‍या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाण्याच्या टाकीचा (जलकुंभ) भूमिपूजन सोहळा नुकताच सरपंच विलास नारायण पाटील आणि सोनाली विलास पाटील या दाम्पत्याच्या हस्ते झाला. या वेळी सरपंच विलास पाटील यांनी सांगितले की, उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गाव परिसराचे औद्योगिकरण …

Read More »

शाळकरी मुले सोशल साईट्सच्या विळख्यात

नवी मुंबई : प्रतिनिधी सोशल मीडियातील विविध माध्यमे मानवाला वास्तविक जगापासून दूर घेऊन जात आहेत. याच्या वापराने लोक भ्रामक विश्वात राहण्यावर विश्वास ठेवत आहेत, परंतु या समस्येवर योग्य निदान शोधण्याकडे कोणाचे लक्ष नाही. युवकांसोबत शाळकरी मुलेसुद्धा या भ्रामक जगात गुंग होत आहेत. समाजाच्या दृष्टीने ही चांगली लक्षणे नाहीत, असे निरामय …

Read More »