पनवेल : बातमीदार पेण तालुक्यातील एका विवाहितेला रस्त्यात अडवून तिला दमदाटी करीत, तसेच तिचा हात पकडून विनयभंग करणार्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पेण तालुक्यातील एक महिला दररोज पनवेल ते पेण असे ये-जा करीत असते. तिचा उलवे येथील बामणडोंगरी येथे राहाणारा गौतम कृष्णा कदम (38) हा पाठलाग करीत असे. …
Read More »चिर्ले येथे रंगले पोपटी कविसंमेलन
चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले येथील इतिहास संशोधक तथा काव्यदरबार मंडळाचे अध्यक्ष के. एम. मढवी त्यांच्या निवासस्थानी पोपटी कविसंमेलन रंगले. या वेळी काव्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ जांभळे यांनी, सगुण साकार ईश्वराची उपासना आपण करतो तशी साहित्याची साधना करा. साहित्याला स्थळ काळाची मर्यादा नसते; तर शब्दभावना महत्त्वाच्या …
Read More »महिलांनी लुटला फॅशन शोचा आनंद
खांदा कॉलनी : बातमीदार नवीन पनवेलजवळील आदई येथील भव्य अशा अष्टविनायक गृहसंकुलामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सादर केलेला फॅशन शो हे प्रमुख आकर्षण ठरले. या वेळी महिलांनी विविध प्रांतातील वेषभूषा आणि रंगमंचावरील पदविन्यासाने रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. प्रसिद्ध फॅशन केरिओग्राफर …
Read More »आदिवासी महिलांना रोजगाराची भेट
पनवेल : वार्ताहर सिटीझन्स् युनिटी फोरम अर्थात कफ संस्थेने ज्या ठिकाणी वृक्षलागवड केली त्या फणसवाडी येथील आदिवासी महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला. त्यासाठी पेपर डिश बनवायचे मशिन फणसवाडी येथे बसवून दिले. पाले बुद्रुक गावचे सरपंच सचिन तांडेल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘कफ’तर्फे …
Read More »वाहनचोराला अटक; 11 दुचाकी हस्तगत
पनवेल : वार्ताहर डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने मोटरसायकल चोरणार्या तरुणाला वाहन चोरी प्रतिबंधक युनिटने अटक केली आहे. नदिम युसूफ शेख (30) असे या चोरट्याचे नाव असून, त्याने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईच्या विविध भागातून दोन लाख 30 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ही सर्व वाहने …
Read More »‘रोटरी’तर्फे महिलांचा सन्मान
पनवेल : प्रतिनिधी महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान स्त्रीशक्तीचा या अंतर्गत रोटरी महिला सन्मान पुरस्कार 2019 वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात समाजात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रांतील एकूण 24 महिलांचा गौरव …
Read More »कर्जत-लोणावळा मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात; पॅसेंजर असोसिएशनची मागणी
कर्जत : बातमीदार व्यापार उदीम आणि आपल्या नातेवाईकांकडे कर्जत तालुक्यातील प्रवाशी मोठ्या संख्येने पुणे भागात जात असतात. मात्र पुण्याकडे जाण्यासाठी असलेल्या अपुर्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असतात. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात पनवेल मार्गे जाणार्या व येणार्या सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यां तसेच पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्या …
Read More »तालुक्यातील 17 गावांचा म्हसळा पोलीस ठाण्यात समावेश करण्याची मागणी
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील 82 पैकी 17 महसुली गावे दिघी सागरी, गोरेगाव व श्रीवर्धन या तीन पोलीस ठाण्याला जोडली आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या ते अडचणीचे होत आहे. म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडी, रोहीणी, आडी ठाकूर, गोंडधर, काळसुरी, खानलोशी ही 4164 लोकसंख्येची सहा गावे दिघी सागरी पोलीस ठाण्याला, आंबेत, तोराडी, लिपणी, वावे, महमद …
Read More »सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय देणार रविशेठ पाटील यांचे आश्वासन, थांब्याबाबत चर्चा
पेण : प्रतिनिधी आरटीओ अधिकारी तसेच पेण नगर परिषद अध्यक्षा व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून, मिनिडोअरसाठी एसटी स्टँडसमोर विक्रम अधिकृत थांबा दिला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. शहरांतून ग्रामीण भागात सेवा देणार्या विक्रम मिनीडोअरसाठी एसटी स्टॅडसमोर अधिकृत थांबा द्यावा, अशी मागणी …
Read More »राज्यात तापमानाचा पारा वाढला; यवतमाळात सर्वाधिक तापमान
पुणे ः प्रतिनिधी राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper