कच्छ ः वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका 50 वर्षीय संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. बीएसएफ आणि सुरक्षा यंत्रणांकडून या संशयित पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना …
Read More »चोरीच्या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणार्यांवर कारवाई ; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणार्या दोन इंग्रजी वृत्तपत्रांविरोधात ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणुगोपाळ यांनी सुप्रीम कोर्टात दिली. फ्रान्सबरोबर 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी …
Read More »पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवनाला भीषण आग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काल इमारतीच्या 5 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत एका सीआयएसएफ निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे …
Read More »कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्यांसाठी 21 लाखांची मदत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या बचतीमधील 21 लाख रुपये कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्यांसाठी मदतनिधी म्हणून दिले आहेत. कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनाबद्दल मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. तसेच हा कुंभमेळा पुढील कित्येक वर्षांसाठी प्रेरणादायी अन् ऊर्जा देणारा ठरेल, असेही मोदींनी …
Read More »विकासाची मोठी भरारी घेण्यास कोकण सज्ज; मुख्यमंत्र्यांचा विश्वास; चिपी विमानतळ इमारतीचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) …
Read More »प्राचीन केसरी कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद
पनवेल : पनवेल तालुक्यात महाशिवरात्र विविध कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नेरे येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने ‘प्राचीन केसरी महासंग्राम’ या कुस्ती सामन्यांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या सामन्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …
Read More »मोतीलाल कोळी यांची तालुकाध्यक्षपदी निवड
पनवेल : रायगड जिल्हा कामगार आघाडीच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी मोतीलाल कोळी यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कोळी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी भाजपा कामगार आघाड़ी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, रोहा तालुका कामगार आघाडी अध्यक्ष रवींद्र …
Read More »पनवेल मनपाची विकासकामे जोरात
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीमध्ये विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेलमधील मच्छी मार्केटचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल कोळीवाडा येथील मच्छी …
Read More »माजी आयुक्तांच्या अहंकारामुळे कोट्यवधींचे नुकसान
पनवेल : नितीन देशमुख पनवेल महापालिकेच्या माजी आयुक्तांच्या अहंकारामुळे महापालिकेचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असून त्याचा फटका महापालिकेला पुढील काही वर्षे बसणार आहे. त्याचा परिणाम नागरिकांना मिळणार्या सुविधांवर होणार असल्याची माहिती यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना समोर आली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. त्यावेळी 110 किमी चौ.कि.मी. …
Read More »नगरसेवक भोपींच्या पाठपुराव्याने पथरस्त्यांचे काम
खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त सेक्टर 8मधील नागरिकांच्या तक्रारीनुसार नगरसेवक संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून पथरस्त्यांचे काम मंजूर करून घेतले आणि मंगळवारी (दि. 5) प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर नगरसेवक संजय भोपी, महानगरपालिका स्थायी समिती सदस्या सीताताई पाटील, भाजपा पनवेल शहर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper