Breaking News

Ramprahar News Team

परवडणार्या घरांना फक्त एक टक्का जीएसटी

नवी दिल्ली : आपल्या घराचे स्वप्न पाहणार्‍यांना जीएसटी परिषदेने एक सुखद दिलासा दिला आहे. घरांवर लागणार्‍या वस्तू आणि सेवा करात मोठी कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर; तर परवडणार्‍या (अ‍ॅफोर्डेबल) घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांवरून थेट एक टक्का करण्यात आला आहे. …

Read More »

दिग्गजांच्या विक्रमाशी इशान किशनची बरोबरी

मुंबई : प्रतिनिधी झारखंड संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरे शतक ठोकले. दिल्लीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भोपळाची फोडू न शकलेल्या इशानने पुढील दोन सामन्यातं खणखणीत शतक झळकावले. जम्मू-काश्मीर संघाविरुद्धच्या 55 चेंडूंवरील 100 धावांच्या खेळीनंतर इशानने मणिपूर संघाविरुद्ध 62 चेंडूंत 113 धावा चोपल्या. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या खेळीत त्याने …

Read More »

भारताच्या सौरभ चौधरीचे विश्वविक्रमी सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने रविवारी (दि. 24) नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात 245 गुणांच्या विश्वविक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले. प्रथमच वरिष्ठ स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होताना सौरभने या अविश्वसनीय कामगिरीसह 2020मध्ये होणार्‍या टोकियो …

Read More »

बुद्धिबळ स्पर्धेत समीर कठमाले विजेता

पनवेल : बातमीदार येथील अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी आणि व रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यामानाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 250हून अधिक स्पर्धक व 200 पालकांचा सहभाग लाभला. अव्वल मानांकित इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाले स्पर्धेचा विजेता ठरला. स्पर्धेत फीडे …

Read More »

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा; एअर इंडिया, पेट्रोलियम क्रीडा मंडळ विजेते

कुडाळ : प्रतिनिधी येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटरमध्ये चालू असलेल्या 47व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतरसंस्था सांघिक पुरुष गटामध्ये एअर इंडियाने; तर महिला गटामध्ये पेट्रोलियम क्रीडा मंडळाने बाजी मारली. रिझर्व्ह बँकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू झहीर पाशाने एअर इंडियाच्या झैद अहमदला 15-9, 23-17 असे पराभूत करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती, …

Read More »

श्रीलंकेचा आफ्रिकेवर ऐतिहासिक मालिका विजय

पोर्ट एलिझाबेथ : वृत्तसंस्था ओशाडा फर्नाडो आणि कुशल मेंडिस यांनी झळकावलेल्या शानदार नाबाद अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांची ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका हा पहिला आशियाई, तसेच इंग्लंड आणि …

Read More »

टी-20मध्ये अफगाणिस्तानचा विक्रम तब्बल 278 धावा चोपल्या

डेहराडून : वृत्तसंस्था अफगाणिस्तान संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 क्रिकेट सामन्यात 3 बाद 278 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. ऑस्ट्रेलिया संघाने 2016मध्ये श्रीलंकेविरुद्ध 3 बाद 263 धावा केल्या होत्या. हा विक्रम अफगाणिस्तानने मोडला. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाला 6 बाद 194 धावा करता आल्या. या लढतीत 84 …

Read More »

नेरळ भाजपच्या नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद; उपक्रम यशस्वी

कर्जत : बातमीदार नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल येथील श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेरळ येथील 73व्या  नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. नेरळ भाजप शहर कार्यालयात आयोजित केलेल्या या नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन भाजप प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण विभाग संयोजक नितीन कांदळगावकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी भाजपचे …

Read More »

खोपोली भाजप उपाध्यक्षपदी चंद्राप्पा अनिवार, इंदरमल खंडेलवाल

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक चंद्राप्पा अनिवार आणि इंदरमल खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोपोली दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.  कार्यकर्त्यांनी आगामी काळात जोरदार कामाला लागावे, असा सल्ला पालकमंत्री चव्हाण यांनी …

Read More »

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नागोठणे बंद

नागोठणे : प्रतिनिधी पुलवामा येथे भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष तसेच व्यापारी संघटना, रिक्षा तसेच इतर सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या नागोठणे बंदला  मंगळवारी (19 फेब्रुवारी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ, खुमाच्या नाक्यावरील दुकाने तसेच हॉटेल, सलून, टपर्‍या, तीन व सहा आसनी रिक्षा बंद ठेवून …

Read More »