Ramprahar News Team

वाहतूक कोंडी न होण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा

पनवेल ः रामप्रहर वृत्त सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ-शिरवणे व बेलापूर येथील महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामामुळे चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये यासाठी वाहतूक विभाग सतर्क झाला आहे. याठिकाणी विविध उपाययोजनांसह अतिरिक्त वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सायन-पनवेल मार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडी होत होती, परंतु आता यात …

Read More »

मुंबई कस्टम झोनची धडक कारवाई; तळोजात 538 कोटींचे ड्रग्ज केले नष्ट

पनवेल ः वार्ताहर मुंबई कस्टम झोन-3तर्फे विविध ठिकाणच्या कारवाईतून गेल्या वर्षभरात जप्त केलेले 538 कोटी रुपये किमतीचे 140.57 किलो ड्रग्ज शुक्रवारी (दि. 30) पनवेलजवळील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड फॅसिलीट याठिकाणी नष्ट करण्यात आले. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करून ते एकत्रित साठवले जातात. …

Read More »

…उलट्या बोंबा

भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कुचराई झाल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. सध्या सणासुदीचा विराम घेतलेली ही यात्रा पंजाब आणि जम्मू-काश्मीर या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशा राज्यांमधून यापुढे जाणार आहे. त्याआधीच हेतुपुरस्सर हा कांगावा करण्यात आला, परंतु केंद्रीय राखीव सुरक्षा दलाने …

Read More »

खालापूरच्या शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा कालवा दुरुस्त करून दिलासा देण्याची मागणी

खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माजगाव, आंबिवली, वारद, पौंध तसेच या परिसरातील जोडणार्‍या आदिवासीवाड्या असून सन 2017पासून कालवे कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना उन्हाळी भातलागवड करता येत नाही. याबाबत आता नव्याने स्थापन झालेले सरकार गांभिर्याने निर्णय घेईल, अशी आशा येथील शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यातील कालव्या 2017पासून …

Read More »

ऐतिहासिक पद्मदुर्ग झाला चकचक!

मुरूड ः प्रतिनिधी जंजिरा किल्ल्यावर करडी नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खोल अरबी समुद्रात ऐतिहासिक पद्मदुर्ग बांधला होता. या किल्ल्यावर मुरूड पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या मावळ्यांनी गुरुवारी (दि. 29) स्वच्छता मोहीम राबविली. किल्ल्यातील गवत कापणे, गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करणे, तोफांची स्वछता करून योग्य जागी बसवणे, कोटेश्वरी देवीचे मूळ …

Read More »

तुपगावच्या कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात

मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यात परंपरागत मडकी घडविण्याचा व्यवसाय तुपगाव, चौक, चिंचवली आदी कुंभारवाडयात चालत होता. या कुंभारवाड्यांमध्ये 30पेक्षा जास्त कुटूंब आज वास्तव्यास आहेत. सध्या ही मातीची मडकी व विविध प्रकारच्या भांड्यांना मागणी कमी झाल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे कुंभार समाजबांधवांना इतर व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. पूर्वीच्या काळी गरीबांपासून …

Read More »

अलिबागची वाहतूक सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग शहरातील महावीर चौक येथील बंद असलेली वाहतुक सिग्नल यंत्रणा दोन वर्षांनी गुरुवारी (दि. 29) पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. शहरातील वाढणारी वाहनांची संख्या आणि बेशिस्त वाहनचालक यांना लक्षात घेऊन महावीर चौक आणि अशोका सेंटर परिसरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. …

Read More »

सुधागडात शेकापला मोठा धक्का; अडूळसेतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

सुधागड ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणार्‍या अडूळसे ग्रामपंचायत हद्दीतील अडूळसे गावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पाली येथील झाप येथे रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ नुकताच झाला. या वेळी प्रवेश …

Read More »

मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत; पनवेल महापालिकेचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले असून या निर्णयाबद्दल पनवेल महापालिका प्रशासन व आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानण्यात आले आहेत. आभार पत्र देताना भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, श्यामनाथ पुंडे, …

Read More »

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक बक्षीस वितरण

माजी उपमहापौर चारूशीला घरत यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभागाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (दि. 28) उत्साहात साजरा झाला. हा सोहळा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आणि पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली हा …

Read More »