Breaking News

Ramprahar News Team

भरधाव डंपरच्या धडकेने हेटवणे जलवाहिनीची चावी तुटून हजारो लिटर्स पाणी वाया

उरण : प्रतिनिधी, बातमीदार उरण तालुक्यातील चिरनेर – खारपाडा रोडवरील घाटातील   तलाखराच्या खिंडीत मातीने भरलेल्या अवजड व भरधाव डंपरचालकाचा वाहनाचा वाहनवरील ताबा सुटल्याने या  डंपरच्या धडकेने विद्युत पोलासह रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या हेटवणे जलवाहिनीची चावी तोडल्याने जलवाहिनीतील पाण्याचा 25 फुटाहून अधिक उंचावर फवारा उडून हजारो लिटर पाणी वाया गेले. या …

Read More »

जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर दोन डंपरची धडक; चालकाचा मृत्यू

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन डंपरच्या जोरदार धडकेत एका डंपर चालकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 वरील पागोटे (डीआरटी) परिसरातील मार्गावर मागून येणार्‍या मातीने भरलेल्या एका डंपरने दुसर्‍या डंपरला जोराने धडक दिल्याने डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती उरण वाहतूक …

Read More »

उरणमधील धुतूम गावात घरफोडी; लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार

उरण  : प्रतिनिधी उरण तालुक्यातील  धुतूम गावातील रहिवासी सुभाष मोतीराम ठाकूर यांच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला  आहे. पोलिस सूत्रांकडून  मिळालेल्या वृत्तानुसार उरण …

Read More »

तळोजा रेल्वे स्टेशनसमोरील अपघातात दोघे जण जखमी

पनवेल : वार्ताहर एका लॉरीचालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून गाडीचे मागील चाक मोटरसायकल स्वारावर चढवल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जण जखमी झाले असून मोटरसायकलीचेदेखील नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रोडपाली येथे राहणार गोविंदा जैयस्वाल (वय 19) हा त्याचा मित्र साजनकुमार यांच्यासोबत स्कुटर सुझुकी …

Read More »

माथेरानमधील ई-रिक्षांवर ‘टाटा’ची नजर

कन्सल्टन्सिंग सर्व्हिसेस करणार अभ्यास कर्जत : प्रतिनिधी माथेरान हिल स्टेशन म्युनिसिपल कौन्सिलने चाचणी अंतर्गत ई-रिक्षा सेवेवर सामाजिक – पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईची नियुक्ती केली आहे. 40 दिवसांच्या अभ्यासात हातगाड्या, पुशकार्ट आणि घोडेधारक/हँडलर यांच्या आर्थिक पैलूंचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी पालिका सुमारे 10 लाख रुपये खर्च …

Read More »

वणव्यामुळे डोंगरांची शोभा हरवतेय

रोखण्याचे सर्वांसमोर आव्हान; वन्यप्राणी, पक्ष्यांना झळ माणगांव : प्रतिनिधी लांबलेल्या पावसाने हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा वाढू लागल्या नंतर अचानक काळे दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानंतर माळरानावर पसरलेले गवत सुकू लागले आहे. या सुकणार्‍या गवताना अचानक वणवे लागत असून मानवनिर्मित या वणव्यांमुळे डोंगरांचा रंग काळा दिसत आहे. एरवी हिरवेगार …

Read More »

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित व्हा!

माणगावात कुणबी जोडो अभियान; नेत्यांचे समाजबांधवांना आवाहन माणगाव : प्रतिनिधी रायगडसह कोकणात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे. तो विखुरला आहे. त्यामुळे समाजाकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे समाजाची उपेक्षा कायमआहे. हक्क, कर्तव्य समजावून सांगत त्यांची जनजागृती करणे गरजेचे आहे. एकट्याने लढून मिळणार नाही. त्यासाठी एकत्रित ताकद निर्माण करणे गरजेचे आहे. …

Read More »

लोकशाहीसाठी पत्रकारितेचे महत्त्वाचे योगदान -तांबोळी

चौक : प्रतिनिधी खालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व खालापूर तालुका वकील बार असोशिऐशन यांच्या विद्यमाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकारांचा सन्मान,या कार्यक्रमात बोलताना पत्रकारितेचे काम केवळ बातम्या देण्याचं नसून गरिबांना न्याय, विकास कामे, इत्यादी शास्वत विकास कामातही मोलाचे असते.पत्रकारिता ही चौथा आधारस्तंभ असते असे प्रतिपादन  …

Read More »

एमपीएससी अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस

तब्बल चाळीस वर्षांनी अनेक देशांतून पेणमध्ये एकत्र येत आखली योजना पेण : प्रतिनिधी पेणमधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंजीनियरिंग कॉलेजची इमारत अनेक वर्षापासून बंद आहे. यामध्ये 1983 ते 2008 पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जगभरात जाऊन उच्चपदावर नोकरी केली आहे. याच आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यानी तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र …

Read More »

व्हॅली क्रॉसिंगच्या व्यवसायात बेरोजगारांना संधी मिळणार?

माथेरान : प्रतिनिधी व्हॅली क्रॉसिंग सारख्या साहसी खेळांमुळे मागील काही वर्षांपूर्वी माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढली होती. या व्यवसायात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश पॉईंट्सवर  या व्हॅली क्रॉसिंगचे जाळे पसरल्यामुळे पॉईंट्सचा देखावा न्याहाळताना जो आनंद हवा होता तो मिळत नव्हता. व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेताना आजूबाजूला कचराकुंड्या नसल्याने पर्यटकांकडून सुका कचरा …

Read More »