माणगाव : प्रतिनिधीमाणगाव तालुक्यातील खरीवली आदिवासीवाडी येथील दीड वर्षीय बाळाचा बुधवारी (दि. 3) विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुचिता किसन हिलम (वय 23, रा. खरीवली आदिवासीवाडी) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मयत बाळ साहिल …
Read More »देवद ग्रामपंचायतीच्या सदस्यांची भाजपत घरवापसी
पनवेल रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या देवद ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश जुवेकर आणि सुनंदा रणखांबे यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले आहे. देवद …
Read More »कराडे खुर्दच्या प्रभारी सरपंचपदी भाजपच्या यशश्री मुरकूटे
मोहोपाडा : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती चितळे या काही कारणास्तव रजेवर गेल्याने सरपंपदाचा तात्पुरता कारभार पाहण्यासाठी भाजपच्या उपसरपंच यशश्री मुरकुटे यांना प्रभारी सरपंचपद बुधवारी (दि. 3) सोपविण्यात आले. यशश्री मुरकुटे यांची निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नागरिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. या वेळी माजी सरपंच विजय मुरकुटे, …
Read More »भाजपच्या प्रयत्नांमुळे कामगारांना पगारवाढ; सुधीर ठाकूर, विजय घरत यांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत यांच्या प्रयत्नांमुळे 144 कामगारांना पगारवाढ आणि बोनस मिळाला आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सुधीर ठाकूर व विजय घरत यांच्यासह कामगारांनी आभार मानले आहे. न्हावा-शिवडी सी लिंकचे …
Read More »कोरोनाबाबत हलगर्जीपणा केल्यास पुन्हा संकट; लसीकरण आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 100 कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या आढावा बैठकीत दिला. विदेश दौर्यावरून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 3) लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी व्हिडिओ …
Read More »राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त कल्याण गोविली येथील जीवनदीप शिक्षण संस्थेने सब ज्युनिअर-ज्युनिअर (मुले-मुली) राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमधून सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. यात रायगडच्या खेळाडूंनी पाच रौप्य व तीन कांस्यपदके जिंकली. रायगड खेळाडूंच्या या यशाबाबत रायगड पॉवरलिफ्टिंग संघटनेचे गिरीष वेद, अरुण पाटकर, …
Read More »किकबॉक्सिंग स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे सुयश
पनवेल : वार्ताहर अहमदनगरमधील सुपा येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि जुनिअर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंनी सुयश प्राप्त केलेे आहे. या स्पर्धेत 33 जिल्ह्यांतील सुमारे 930 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात पनवेल शहराचा संघ अध्यक्ष जयेश चोगले व सचिव दिक्षा जैन यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता. या 26 खेळाडूंनी म्युसिकल …
Read More »वसुबारसनिमित्त करंजाडेत विविध कार्यक्रम उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त सीरवी समाज संस्था आणि करंजाडे नागरिक मंच यांच्यातर्फे दीपावलीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त सोमवारी (दि. 1) गोमाता वासरु पूजन आणि संगीत संध्या हा गायनाचा कार्यक्रम सायंकाळी करंजाडे सेक्टर 3 येथील दुर्गा माता मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यासोबतच फक्त महिलांसाठी असणारे नवी मुंबईतील पहिले स्वरदुर्गा ढोल ताशा …
Read More »‘होपमिरर’तर्फे गरजू मुलांना स्वेटर वाटप
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईस्थित संस्था होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने थंडीसाठी संरक्षण म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने 100 ते 150 गरजू मुलांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. यासोबतच मुलांना खाऊही देण्यात आला. होपमिरर फाउंडेशन ही रमझान शेख यांनी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था आहे, जिचा प्राथमिक उद्देश हा गरिबांना मदत करणे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कार्थिका नायरचे कौतुक
पनवेल : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट युजी 2021 परीक्षेत नवीन पनवेल येथील कार्थिका जी. नायर हिने 720 पैकी 720 गुण मिळवत भारतातून टॉप विद्यार्थिनीचा मान पटकाविला आहे. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्थिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी महापौर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper