पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर से. 11 मधील शिवशंभो सोसायटीत प्रतीक्षा मंगेश कदम यांच्या मागणीनुसार पनवेल महापालिकेमार्फत रविवारी (दि. 17) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. लसीकरण शिबिराचा 150पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न …
Read More »मुख्यमंत्री, उद्योगमंत्री शिवसेनेचे, तरीही यांना मोर्चा काढावा लागतोय; शेकापच्या पंडित पाटलांनी डिवचले, राष्ट्रवादीवरही टीका
रेवदंडा ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री शिवसेनेचे असताना यांना जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा काढावा लागतोय याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दांत माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. बोर्ली येथील शेकापच्या मुरूड तालुका मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी असंगाशी संग केल्याने व नियोजनअभावी मागील …
Read More »कोरोना निर्बंधात शिथिलता; राज्यातील उपाहारगृहे, दुकानांची वेळ वाढवण्याचा निर्णय
मुंबई ः प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात सोमवारी (दि. 18) टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला, तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबत मात्र नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव …
Read More »आरपीएलच्या बाद फेरी स्पर्धेला प्रारंभ
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीग (आरपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धा नव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी ज्या खेळाडूंचा लिलावात समावेश झाला नाही अशा सर्व खेळाडूंसाठी बाद पद्धतीची क्रिकेट स्पर्धा सोमवार (दि. 19) पासून सुरू झाली आहे. एकूण 400 खेळाडूंनी या स्पर्धेत ऑनलाइन पद्धतीने आपला सहभाग नोंदवला होता. त्यातून 128 खेळाडूंना …
Read More »गोशीन रियूच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
उरण ः प्रतिनिधी जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत आर्मीचर किक बॉक्सिंग असोशिएशन वाको गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात भाग घेतला होता. त्यामध्ये अनेकांनी घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धेत अनिश पाटील, अमिता घरत, अमिषा घरत, रोहित घरत, समीक्षा पाटील, नेहा पाटील, सुजित पाटील, अर्णव पाटील, शुभम ठाकूर यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यांची …
Read More »शिहू बेणसे विभागातील पाच खेळाडूंची चमकदार कामगिरी; राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड
पाली ः प्रतिनिधी शिहू बेणसे विभागातील पाच खेळाडूंची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड झाली आहे. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील डेक्कन जिमखाना जलतरण तलाव येथे खुली …
Read More »रायगडचा महिला क्रिकेट संघ पुण्याला रवाना; नियती जगतापकडे कर्णधारपदाची धुरा
अलिबाग ः प्रतिनिधी पुणे येथे होणार्या महिला चॅलेंजर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा महिला क्रिकेट संघ पुण्याला रवाना झाला. रायगडच्या महिला संघाच्या कर्णधारपदाची धुरा नियती जगताप हिच्याकडे सोपविण्यात आली आहे. अंजली गोडसेची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी रायगडचा महिला संघ जाहीर केला. रायगड …
Read More »ओमानचा पापुआ न्यू गिनीवर विजय
अल अमिरात ः वृत्तसंस्था यजमान ओमानने टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात विजयासह केली आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) 10 गडी राखून पराभव केला. ओमानचा कर्णधार जीशान मकसूदने नाणेफेक जिंकून पीएनजी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पीएनजी संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 129 धावाच करू शकला. ओमानने …
Read More »पहिल्याच दिवशी उलटफेर; वर्ल्डकप स्पर्धेत स्कॉटलंडचा बांगलादेशवर विजय
अल अमिरात ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात उलटफेर पाहावयास मिळाला. स्कॉटलंडने जबरदस्त कौशल्य दाखवत बांगलादेशवर सहा धावांनी विजय मिळविला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाह याने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. स्कॉटलंडने 20 षटकांत 9 गडी बाद 140 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकात 7 बाद …
Read More »केरळमध्ये 21 जणांचा मृत्यू; डझनभर बेपत्ता
तिरूअनंतपूरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 21वर पोहचली आहे. शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसासह भूस्खलनामुळे 12पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पोलीस आणि अग्निशमन दल तसेच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पर्वतीय भागात पूर आला असून नद्या ओसंडून वाहत आहेत. समोर आलेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper