पनवेल : वार्ताहर स्वच्छ भारत सर्वेक्षणांमध्ये पनवेल शहर हे कचराकुंडी मुक्त शहर असेल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपला प्रभाग सुंदर व स्वच्छ असावा यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडे प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगाने नुकतेच प्रभाग क्रमांक 18मधील हॉटस्पॉट ठरत असलेली ठिकाणे आशियाना कॉर्नर, विरुपाक्ष हॉल, नवीन कोर्ट …
Read More »डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ; नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, महापे, तुर्भे आदी भागात डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून धुरीकरण आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तरी, रुग्णसंख्या वाढत असल्याने …
Read More »मिताली राजने रचला इतिहास; क्रिकेट कारकिर्दीतील 20 हजार धावा पूर्ण
मॅके (ऑस्ट्रेलिया) ः वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मॅकेच्या हारुप पार्क मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजने 61 धावांची खेळी खेळली. या खेळादरम्यान मितालीने तिच्या कारकिर्दीतील 20 हजार धावांचा टप्पा पार केला. याचबरोबर मितालीचे …
Read More »बीसीसीआयकडून खेळाडूंना मानधनवाढ; गत स्थानिक हंगामासाठीही मिळणार नुकसानभरपाई
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था यंदाच्या देशांतर्गत स्थानिक क्रिकेट हंगामासाठी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच गतवर्षी रणजी करंडक रद्द करण्यात आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जाणार्या क्रिकेटपटूंना 50 टक्के भरपाई देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. बीसीसीआयच्या कार्यकारी परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गतवर्षी मार्च …
Read More »सुरक्षेवरून इंग्लंडचाही पाकिस्तान दौरा रद्द
लंडन ः वृत्तसंस्था न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते. ‘इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात होणार्या अतिरिक्त सामन्यांविषयी चर्चा करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) बैठक …
Read More »कोलकाताकडून बंगळुरूचा धुव्वा; आयपीएलमध्ये चक्रवर्तीचा प्रभावी फिरकी मारा
अबुधाबी ः वृत्तसंस्था फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (3/13), आंद्रे रसेल (3/9) यांनी केलेली प्रभावी गोलंदाजी आणि शुभमन गिल (48 धावा), पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर (नाबाद 41) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नऊ गडी आणि 60 चेंडू राखून …
Read More »हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारेे सरकार; भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
अलिबाग : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौर्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमय्या यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचविण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार आहे. अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, अशी टीका भाजपचे …
Read More »सत्तासम्राटांची पळापळ
भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये देखील किती शक्ती एकवटू शकते याची झलक सोमवारी कोल्हापुरात बघायला मिळाली. भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला यापूर्वीच सळो की पळो करून सोडले आहे. या पळापळीच्या नाटकाचा कळसाध्याय जणू कोल्हापुरात बघायला मिळाला. किरीट सोमय्या यांच्या पाठीमागे हजारो भाजप कार्यकर्त्यांची …
Read More »बाप्पाला रायगडात भावपूर्ण निरोप…
म्हसळ्यात गणेश विसर्जन म्हसळा : प्रतिनिधी नऊ दिवस मुक्काम केल्यानंतर रविवारी म्हसळा शहरातील व तालुक्यातील सुमारे 640 गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरांत व फटाक्यांच्या आतषबाजीत निरोप देण्यात आला. म्हसळा शहरात वंजारा समाजाचा एकच गणपती सार्वजनिक होता व बहुतांश गणपती खाजगी असल्याने …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महाडमध्ये ब्लँकेट वाटप
महाड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महाड येथील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाड भाजप मंडळाच्या वतीने तालुक्यातील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट वाटप करण्यात आले, तसेच तेथील आदिवासी मुलांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper