Breaking News

Ramprahar News Team

सुरक्षेवरून इंग्लंडचाही पाकिस्तान दौरा रद्द

लंडन ः वृत्तसंस्था न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते. ‘इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात होणार्‍या अतिरिक्त सामन्यांविषयी चर्चा करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) बैठक …

Read More »

कोलकाताकडून बंगळुरूचा धुव्वा; आयपीएलमध्ये चक्रवर्तीचा प्रभावी फिरकी मारा

अबुधाबी ः वृत्तसंस्था फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (3/13), आंद्रे रसेल (3/9) यांनी केलेली प्रभावी गोलंदाजी आणि शुभमन गिल (48 धावा), पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर (नाबाद 41) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नऊ गडी आणि 60 चेंडू राखून …

Read More »

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारेे सरकार; भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल

अलिबाग : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौर्‍यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमय्या यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचविण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार आहे. अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, अशी टीका भाजपचे …

Read More »

सत्तासम्राटांची पळापळ

भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये देखील किती शक्ती एकवटू शकते याची झलक सोमवारी कोल्हापुरात बघायला मिळाली. भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला यापूर्वीच सळो की पळो करून सोडले आहे. या पळापळीच्या नाटकाचा कळसाध्याय जणू कोल्हापुरात बघायला मिळाला. किरीट सोमय्या यांच्या पाठीमागे हजारो भाजप कार्यकर्त्यांची …

Read More »

बाप्पाला रायगडात भावपूर्ण निरोप…

म्हसळ्यात गणेश विसर्जन म्हसळा : प्रतिनिधी नऊ दिवस मुक्काम केल्यानंतर रविवारी म्हसळा शहरातील व तालुक्यातील सुमारे 640 गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरांत व फटाक्यांच्या आतषबाजीत निरोप देण्यात आला. म्हसळा शहरात वंजारा समाजाचा एकच गणपती सार्वजनिक होता व बहुतांश गणपती खाजगी असल्याने …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महाडमध्ये ब्लँकेट वाटप

महाड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महाड येथील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाड भाजप मंडळाच्या वतीने तालुक्यातील गोंडाळे आदिवासीवाडीवर ब्लँकेट वाटप करण्यात आले, तसेच तेथील आदिवासी मुलांना …

Read More »

अतिवृष्टीबाधित पाणीपुरवठा योजना निधीच्या प्रतीक्षेत

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत महाड तालुक्यातील शासकीय मालमत्तेबरोबरच गावागावांतील नळपाणी पुरवठा योजनादेखील बाधित झाल्या. अनेक गावांच्या पाणी योजना पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, तर विहिरी कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या. या पाणीपुरवठा योजना, पाण्याचे उद्भव, स्त्रोत आदीच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाला निधीची गरज आहे. महाड तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन महापूर आला. यामध्ये रस्ते, …

Read More »

पनवेलमध्ये चालक दिन साजरा

पनवेल : वार्ताहर शासनाने 17 सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे व रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व प्रादेशिक परिवहन कार्यालय …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेची पाहणी

रतलाम : वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शुक्रवारी खुद्द गडकरींनी मध्य प्रदेशातल्या रतलाममध्ये रस्त्याचे परीक्षण केले. गडकरींनी एका कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी त्यांची कार 170 प्रतिकिमी वेगाने धावत होती. गडकरींनी द्रुतगती महामार्गाच्या घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ आता …

Read More »

आरोग्य कर्मचार्‍यांवर मानसिक परिणाम; कोरोनाबाबत ‘आयसीएमआर’च्या अभ्यासाचा निष्कर्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना साथीचा आरोग्य कर्मचार्‍यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या अहवालात समोर आला आहे. आयसीएमआरने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कामाचे तास आणि तीव्रता, लोकांचे गैरवर्तन आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या असलेल्या अतिरिक्त जबाबदार्‍या ज्यात त्यांना नवीन प्रोटोकॉलशी जुळवून घ्यावे …

Read More »