Breaking News

Ramprahar News Team

सायकल रॅलीला पनवेलमध्ये प्रतिसाद; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छतेचा संदेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील इन्फिनिटी फाऊंडेशन, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत आणि नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्दिष्ट स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल …

Read More »

चिरनेेर जंगल सत्याग्रहाचा आज 91वा स्मृतिदिन

चिरनेर : प्रतिनिधीउरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. 1930च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने चिरनेर येथे दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी अभिवादन करण्यात येते. चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि नवी मुंबई पोलीस यांच्या …

Read More »

दाखले वाटप शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (दि. 24) कळंबोली येथील …

Read More »

पनवेल मनपातर्फे महिलांसाठी विशेष प्रशिक्षण योजना

पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेतर्फे महिला बालकल्याण विभागांतर्गत प्रशिक्षण आणि मुलींसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षणांतर्गत महिलांना व मुलींना शिवणकाम, ब्युटिशन, फॅन्सी बॅग, पेपरच्या पिशव्या तयार करणे, बेकिंग प्रॉडक्ट, केक तयार करणे असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणार्‍या मुलींना …

Read More »

अनंत गीते भंगारात काढलेले नेते; राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांची खरमरीत टीका

कळंबोली : बातमीदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यावर जर कोणी गरळ ओकत असेल, तर ते पक्ष कदापि सहन करणार नाही. अनंत गीते हे शिवसेनेने भंगारात काढलेले नेते असून ते दोन वर्ष  विजनवासात होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी कळंबोली येथे गुरुवारी (दि. …

Read More »

कधी थांबणार बलात्कार?

तब्बल 29-30 समाजकंटकांनी सुमारे आठ महिने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करावेत ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. कुठलाही सुजाण नागरिक यामुळे शरमेने मान खाली घातल्याशिवाय राहणार नाही. डोंबिवलीतील या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटतील किंबहुना प्रसारमाध्यमे हे काम आवर्जून करतील. यामुळे महाराष्ट्राची उरलीसुरली अब्रूदेखील नष्ट होणार आहे. देशभरातील …

Read More »

रायगड जिल्ह्यात वाहनविक्रीत घट

अलिबाग : प्रतिनिधी करोनाचा प्रादूर्भाव आणि टाळेबंदी याचा फटका रायगडातील वाहन विक्री व्यवसायाला बसला आहे. जिल्ह्यात गेल्या दिड वर्षात वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वाहन विक्रीतून जमा होणार्‍या महसुलातही  घट झाली आहे. रायगड जिल्ह्यात पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत वाहनांची नोंदणी केली जाते. दरवर्षी साधारणपणे 27 ते 28 …

Read More »

मुरूडमधील विहूर पूल धोकादायक; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

मुरूड : प्रतिनिधी अतिवृष्टीमध्ये मुरूड-मुंबई रस्त्यावरील विहूर पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. सततच्या पावसामुळे येथील खड्डा मोठा होत आहे, मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी मात्र येथून जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत. मुरूड येथून मुंबईकडे जाणार्‍या महत्त्वाच्या मार्गावर …

Read More »

मुरबाड-कर्जत महामार्गावरील म्हसा येथील पुलाला भेगा

कर्जत : बातमीदार मुरबाड-कर्जत-खोपोली महामार्गावर म्हसा येथे बांधलेल्या नवीन पूलाला काही महिन्यातच भेगा पडल्या आहेत. या पुलाला काही धोका निर्माण झाल्यास हा महामार्ग बंद होऊ शकतो. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा रस्ते विकास महामंडळकडून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गवरील वाहने कसारा-डोळखांब येथून …

Read More »

अलिबागमधील सागाव फिडरमध्ये बिघाड; पाच हजार ग्राहक अंधारात; 16 तासाने वीजपुरवठा सुरळीत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) रात्री मुसळधार पावसासोबत वीजाही चमकत होत्या. अलिबाग तालुक्यातील सागाव फिडरवरील वाडगाव येथील इन्सुलेटरवर वीज पडून रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाच हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. सोळा तासानंतर बुधवारी वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कर्मचार्‍यांना यश आले आहे.  अलिबाग तालुक्यातील …

Read More »