Breaking News

Ramprahar News Team

चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांचा धिंगाणा; दारूच्या बाटल्या आणि कचर्‍याचा खच

उरण ः वार्ताहर कोरोनाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे शासनाचे आदेश असतानाही बंदी आणि लॉकडाऊन झुगारून रविवारी (दि. 11) चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. दिवसभर या ठिकाणी मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता. येथे आलेल्या पर्यटकांनी या पवित्र भूमीवर दारूच्या बाटल्या आणि कचर्‍याचा खच टाकला. …

Read More »

चिरनेरचे आदिवासी अद्यापही रस्त्याविना; ग्रामपंचायतीचा उदासीन कारभार

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यात आल्याने त्यांना नवा थाट लाभला आहे, मात्र चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगरकुशीत वास्तव्य करणार्‍या केल्याचा माळ आदिवासी वाडीवरील कातकरी- आदिवासींना अद्यापही चिखलाची वाट तुडवत घर गाठावे लागत आहे. या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतून दोन वर्षांपूर्वीच 17 लाखांचा निधी मंजूर होऊनही …

Read More »

अतिवृष्टीदरम्यान काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात 11 ते 15 जुलैदरम्यान जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीत घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास …

Read More »

सुधागडातील पर्यटनबंदी उठवावी स्थानिकांचे तहसीलदारांना निवेदन

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सुधागड किल्ला, ठाणाळे व नेणवली लेणी येथे पर्यटकांना जाण्यासाठी सुधागड वन विभागाने बंदी घातली आहे. ही बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. सोमवारी (दि. 12) या संदर्भातील निवेदन पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले. येथील प्राचीन व ऐतिहासिक बौद्ध लेण्या इतिहासाला …

Read More »

वरंडोली येथील मोरीचे पिलर्स ढासळले; महाड-रायगड मार्ग बंद पडण्याची शक्यता

महाड : प्रतिनिधी महाड-रायगड मार्गावर वरंडोली गावानजीक नाल्यावरील मोरीचे पिलर्स ढासळू लागल्याने हा मार्ग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे.  महाड-रायगड मार्गावर वरंडोली ते कोथूर्डे फाटा यादरम्यान एका वळणावरील नाल्यावर असलेल्या मोरीचे पिलर्स पावसामुळे ढासळू लागले आहेत. पिलर्सचे दगड ढासळून खाली पडू लागले …

Read More »

पेणमध्ये कोरोनाचा वाढता कहर, 10 दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत चालली आहे. जुलै महिन्याच्या 10 दिवसांतच कोरोना संसर्गामुळे जवळपास 27 रुग्णांचे बळी गेले आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत असून नगरपालिका, पोलीस तसेच आरोग्य प्रशासनावर ताण येत आहे. पेण तालुक्यात 24 जूनला एका दिवसात 100च्या वर रुग्ण आढळून आले होते. रुग्णांची …

Read More »

वाढीव घरपट्टी रद्द करा; अन्यथा खोपोली भाजपचा आंदोलनाचा इशारा

खोपोली ः प्रतिनिधी येथील नगरपालिकेने आर्थिक वर्षात जी वाढीव घरपट्टी आकारली ती अन्यायकारक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ती रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना सोमवारी (दि. 12) दिले. मागील दोन वर्षांपासून कोविड महामारी तसेच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. …

Read More »

बिघाडीची अवलक्षणे

गेली दीड-पावणेदोन वर्षे सत्तेला चिकटून बसलेले महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधाची सारी लक्षणे आता स्पष्टपणे दाखवू लागले आहे. हे सरकार कोणी पाडण्याची गरज नाही, आपल्या अंतर्विरोधानेच ते पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी केले होते. राजकारण्यांचे सोडा, अनेक राजकीय पंडितांचाही तोच अंदाज होता, तथापि इतका टोकाचा अंतर्विरोध …

Read More »

पावसाच्या पुनरागमनामुळे रायगडात लावणीच्या कामांना वेग

अलिबाग : प्रतिनिधी पावसाने 12 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे रखडलेली भातलावणीची कामे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत.  लावणीच्या कामाला आता वेग आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली. कडक ऊन पडल्यामुळे …

Read More »

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील पूल कोसळला; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील जुना छोटा दगडी पूल रविवारी (दि. 11) कोसळला. त्या वेळी पुलावरून एक चारचाकी आणि दोन दुचाकी जात होत्या. ती वाहने पुलासह खाली कोसळली, मात्र वेळीच मदत मिळाल्याने चारचाकीमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले, तर एक दुचाकीस्वार वाहून …

Read More »