Breaking News

Ramprahar News Team

माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी, वाहनांच्या रांगा

कर्जत : प्रतिनिधी पर्यटकांसाठी माथेरान खुले केल्यानंतर आलेल्या पहिल्या वीकेण्डमध्ये वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी माथेरानमध्ये शनिवारी (दि. 3) पर्यटकांची गर्दी उसळली. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका परिसरात तसेच नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना माथेरामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे केवळ पर्यटनावर अबलंबून असलेल्या स्थानिक नागरिक …

Read More »

पेण वरवणेत जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण

पेण : प्रतिनिधी कृषी दिनाचे औचित्य साधून पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पेण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 14 शासकीय व 10 अनुदानित आश्रम शाळांमध्ये गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी चौधरी …

Read More »

कर्जतमधील धरणे, पाझर तलाव यंदा तरी ओव्हरफ्लो होणार का?

कर्जत : बातमीदार तालुक्यात दुबार शेतीसाठी आणि सिंचनासाठी बांधण्यात आलेली धरणे आणि पाझर तलाव गतवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षणतेने भरली नव्हती. यावर्षी तरी पुरेसा पाऊस पडून हे जलाशय ओव्हर फ्लो होतील का? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. कर्जत तालुक्यात 90 टक्के क्षेत्रावर भातशेती केली जात होती. उन्हाळ्यातदेखील भातशेती करता यावी …

Read More »

पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली; महाड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

महाड : प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून महाड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे थांबली आहे. भाताची रोपे करपू लागली असून, चाळीस टक्यापेक्षा अधिक शेतकर्‍यांची लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतीची कामे सुरू झाली. त्यानंतरच्या 15 दिवसांमध्ये नागरणी, …

Read More »

नवी मुंबईतील रुग्णसंख्या वाढवतेय चिंता; दैनंदिन आकडेवारीत कोरोनाबाधित शंभरच्या वर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होताच निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाबाधितांचा आलेख पुन्हा चढणीला लागला आहे. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांत उच्चांकी पातळीवर गेलेला रुग्णवाढीचा आलेख जूनच्या पहिल्या आठवड्यात खाली आल्यानंतर नंतरच्या तीन आठवड्यांत तो वाढत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात …

Read More »

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी कृतीदल कार्यान्वित

अलिबाग : जिमाका कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे कृतीदल कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहणार आहे. कोरोनामध्ये आई, वडिलांचा मृत्यू होऊन रायगड …

Read More »

ठरला एकदाचा फॉर्म्युला!

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डांनी आपापल्या परीक्षांचा फॉर्म्युला गेल्याच महिन्यात जाहीर केला होता. त्यांच्या फॉर्म्युल्याला न्यायालयाने मान्यताही दिली होती. राज्य शिक्षण मंडळांनी आपला मूल्यमापनाचा फॉर्म्युला जाहीर करावा व केंद्रीय शिक्षण मंडळांप्रमाणेच 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करावेत, अशी स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील एचएससी …

Read More »

सामाजिक बहिष्कारात रायगड राज्यात दुसर्‍या क्रमांकावर

पाली : प्रतिनिधी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्या अंतर्गत राज्यात आतापर्यंत एकशेचार गुन्हे दाखल झाले असून यात रायगड जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोकणात काही बाबतीत आजही जुन्या …

Read More »

कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणे होणार जमीनदोस्त; नारीशक्ती संघटनेसमोर प्रशासन नरमले

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत संबंधित खात्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर नारीशक्ती संघटनेने तिसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 1) रात्री आपले आमरण उपोषण स्थगित केले. कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावरील चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हॉटेल, गॅरेज आदी दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या …

Read More »

कोरोनामुळे मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला घरघर

कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध जारी ठेवले असून कोरोनाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे मुरुडसारख्या निसर्गरम्य व ऐतिहासिक स्थळाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने एरव्ही सदैव गजबज असलेल्या तालुक्यातील बीचवर गेल्या काही महिन्यांपासून शुकशुकाट दिसून येत आहे. त्याचा पर्यटनावरच अवलंबून असलेल्या स्थानिक हॉटेल, लॉजिंग व छोट्याछोट्या व्यवसायिकांवर मोठा …

Read More »