नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सर्व जिल्हे तिसर्या टप्प्यात घेतले गेल्याने नवी मुंबई शहरात सोमवारपासून 28 जून ते 5 जुलैपर्यंत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून व्यापारी वर्गामध्ये मात्र मोठी नाराजी पसरली आहे. दुकानांच्या वेळाही बदलण्यात आल्या असून आता दुपारी चार …
Read More »शक्तिवर्धकाचा दुसरा डोस
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आणखी एका भरीव आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दुसर्या आर्थिक पॅकेजनंतर विरोधक मात्र गडबडून गेलेले दिसले. जाहीर झालेल्या या ताज्या आर्थिक सवलती अपुर्या कशा आहेत याबद्दल नेहमीप्रमाणे ओरड होईलही, परंतु प्राप्त परिस्थितीचा विचार केल्यास नवे आर्थिक पॅकेज शक्तिवर्धकाच्या मात्रेप्रमाणे काम …
Read More »कोरोनाचे नियम मोडल्याने माणगावात चार दुकाने सील
माणगाव : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माणगाव नगरपंचायतीने शहरातील चार दुकानांना टाळे ठोकले असून काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. माणगाव शहर तसेच तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ती आटोक्यात आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अनेक नागरिक व व्यापारी कोरोनाविषयक नियमांचे राजरोस उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस व …
Read More »माथेरान पर्यटकांनी गजबजले; व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये उत्साह
माथेरान : रामप्रहर वृत्त बंदी उठताच माथेरानमध्ये रविवारी (दि. 27) पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांत उत्साह संचारला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातल्याने माथेरानचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे येथील नागरिक व व्यावसायिक अडचणीत आले होते. पर्यटकांसाठी माथेरान खुले करावे, अशी मागणी भाजपतर्फे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली …
Read More »किल्ले रायगडाला हवे आधुनिक पद्धतीचे संरक्षण
कोकणामध्ये दरवर्षी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होतो. अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडतात आणि त्यामध्ये जीवितहानीप्रमाणे वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात होते. या विजेमुळे अनेक ऐतिहासिक वास्तूंचेदेखील नुकसान होत असल्याने किल्ले रायगडासह कोकणामध्ये असलेल्या पुरातन ऐतिहासिक वास्तूंचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी …
Read More »सुधागडात 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू
पाली : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच तिसर्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आल्याने चिंतेत भर पडली. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरणावर भर दिला जातोय. सुधागडातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 44 वयोगटासाठी शनिवार (दि. 26) पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार 18 ते …
Read More »आदिवासी बालकाची भट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलिसांच्या तत्परतेमुळे रोहा तालुक्यातील चिंचवली खोंडावाडी येथील आदिवासी कुटुंबातील सहा वर्षांच्या मुलाची नांदेड येथील कोळसाभट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका झाली. हा मुलगा दीड महिन्यानंतर आपल्या घरी आला आहे. चिंचवली खोंडावाडी येथील सुनील अप्पा जाधव, राहुल सुनील जाधव (वय 6), गुलाब वसंत पवार, वसंत पवार, संतोष भास्कर पवार …
Read More »सेंट जोसेफ विद्यालयाचा उद्दामपणा; शिक्षण अधिकार्यांच्या पत्राला केराची टोपली
कळंबोली : बातमीदार कळंबोलीच्या सेंट जोसेफ विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण शाळा प्रशासन देत नाही. पनवेलच्या गट शिक्षण अधिकार्यांनी लेखी पत्र देऊनही शाळा प्रशासनाने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण असून याबाबत विद्यालयाच्या विरोधात पालक वर्ग …
Read More »नवी मुंबई झाली भूमिपुत्रमय!
नवी मुंबई : प्रतिनिधी अखेर तो दिवस उजाडला…..म्हणत रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी पहाटेपासूनच नवी मुंबईकडे धाव घेतली. बघता बघता नवी मुंबईतील रस्ते ही प्रकल्पग्रस्तमय झाले. म्हणे आम्हाला आमच्या बापाचे नाव विमानतळाला मिळावे या मागणीसाठी आज आम्हाला एकजुट दाखवावी लागली. आंदोलन व वटपौर्णिमादेखील योगायोगाने एकाच …
Read More »ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवारी (दि. 26) राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत, अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper