Breaking News

Ramprahar News Team

युरो कप : इटलीची बाद फेरीत धडक

रोम ः वृत्तसंस्था युरो कप स्पर्धेच्या ‘अ’ गटातील चौथ्या सामन्यात इटलीने स्वित्झर्लंडला 3-0ने मात दिली. सलग दोन विजयांसह इटलीने बाद फेरीत धडक मारली आहे. इटलीचा मिलफिल्डर मॅन्युअल लोकेटेली याने 26व्या आणि 52व्या मिनिटाला दोन गोल केले. या गोलसाठी डॉमेनिका बेरार्डी याने पास दिला होता. लोकेटेलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल …

Read More »

वरुणराजाची बळीराजाला साथ; भातपिकास अनुकूल वातावरणामुळे शेतकरी आनंदला

पेण : प्रतिनिधी  मृग नक्षत्राच्या सात दिवसांत चांगला पाऊस पडल्यानंतर पेण तालुक्यात शेतामध्ये पाणी साचले आहे. या अगोदर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळून जमीन भिजली होती. मे अखेरच्या धूळ पेरणीची कामे पूर्ण करून जूनच्या प्रारंभी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसाच्या आगमनाने भात शेतीमधील नर्सरी रोपांची उगवण चांगली झाली. मृग नक्षत्राचा …

Read More »

रोह्यात धान्यवाटप; संजय कोनकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी रोह्याचे माजी नगराध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते सजंय कोनकर यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग याच्या माध्यमातून रोहा येथील लोहार कुटुंबीयांना एक महिन्याचे धान्य देण्यात आले. सजंय कोनकर, युवामोर्चाचे जिल्हा संयोजक राजेश डाके, …

Read More »

पाच दिवसांच्या हुलकावणीनंतर रायगडात पावसाची दमदार हजेरी

अलिबाग : प्रतिनिधी हवामान खात्याच्या अंदाजाला पाच दिवस हुलकावणी देणार्‍या पावसाने बुधवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागात पावसाची संततधार सुरू होती. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. अधूनमधून जोरदार सरी …

Read More »

खोपोलीत कोरोना रुग्णसंख्या स्थिर; औद्योगिक क्षेत्रासह जनजीवन होतेय सामान्य

खोपोली : प्रतिनिधी मागील दहा दिवसांपासून खोपोली नगरपालिका क्षेत्रात दैनंदिन नवीन कोरोना रुग्णसंख्या पंधराच्या खाली येऊन स्थिरावली आहे. एका बाजूला चाचण्या वाढल्या असून, नवीन रुग्णसंख्या स्थिर असल्याने नागरिक व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील दैनंदिन व्यवहार व औद्योगिक क्षेत्रातील कामकाजही नियमांचे पालन करून पूर्ण क्षमतेने सामान्यपणे सुरू झाले आहे. …

Read More »

सुधागडातील आदिवासींच्या जमिनी धनदांडग्यांनी लाटल्या; पाच वर्षांतील व्यवहारांची होणार चौकशी, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय यादव यांच्या पाठपुराव्याला यश

पाली : प्रतिनिधी आदिवासींच्या जमिनी खरेदी व विक्री व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार  सुधागड तालुक्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या आदिवासींच्या जमिनीच्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. सुधागड तालुक्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत. मात्र या जमिनी बिगर आदिवासींना कवडीमोल किंमतीला विकल्या जात …

Read More »

कोरोनाविषयक निर्बंधातून रायगडला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर हळूहळू कमी होत आहे. मात्र अजूनही हा दर 10 टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे करोनाविषयक निर्बंधांतून रायगड जिल्ह्याला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.  रायगड जिल्ह्यात एक हजार 500 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 728 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. …

Read More »

राजमाता जिजाबाई हिंदवी स्वराज्याची प्रेरणा

राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त लेख… परकीय आक्रमणामुळे प्रजा नाडली-पिडली गेली होती, परंतु लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई अत्यंत बाणेदार व स्वाभिमानी स्त्री होती. राजघराण्याचा वारसा असल्याने आपल्या सासरी तसेच माहेरी त्यांनी अनेक लढाया पाहिल्या होत्या, लढाईच्या रोमहर्षक कथा ऐकल्या होत्या. मराठी माणसाला, महाराष्ट्राला  संकटातून वाचविण्याचा त्यांनी …

Read More »

पोलादपूरच्या हिरवाईची पर्यटकांना साद

पोलादपूर तालुक्यामधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील निसर्गसौंदर्याची अपरिमित उधळण पाहण्यासाठी येथील हिरवाईने आता पर्यटकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. येथील ’सोनपंखी’ कार निसर्गकवी कै. वसंत पालकर यांनी, माझं सुंदर कोकण। जणू सोनियाची खाण॥फेडी डोळ्यांचं पारणं। लाल मातीचं कोंदणं॥ गिरी कंदरी चालते। नद्या ओढ्यांचं गायन॥आसमंती सागराचे। घुमे स्वप्नील गुंजन॥ अशा काव्यपंक्तींद्वारे येथील निसर्गसौंदर्याचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; अल्पसंख्याक समाजाला धान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने अल्पसंख्याक समुदायामध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14मधील अल्पसंख्याक समुदायामध्ये जवळपास 1150 धान्याचे किट वितरीत करण्यात आले. याबद्दल नगरसेवक …

Read More »