Breaking News

Ramprahar News Team

आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाची टोलवाटोलवी करू नका; भाजप युवा नेते समीर केणी यांचा सिडकोला इशारा

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या उभारणीसाठी गाभा क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या विमानतळासाठी जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना मात्र सेवा सुविधांच्या बाबतीत अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. चिंचपाडा पुष्पक नोडमधील नागरी आरोग्य केंद्र हस्तांतरण प्रक्रियेतील त्रुटींमुळे बंद आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवा मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र या …

Read More »

चिरनेरमध्ये लसीकरण मोहीम

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथे आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेत 55 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरुवातीला 4 ते 10 जून असा लॉकडाऊन करण्यात आला होता. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सुचनेमुळे त्यात पुढील तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. एकूण या 10 …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या व्यापार्‍यांसह सिडकोच्या एमडींसोबत बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसीतील वाढीव एफएसआय, शिल्लक एफएसआय, पुनर्बांधणी, कन्व्हेंस डिड, एपीएमसीला लागू होणारे सिडकोची धोरणे, भूखंड हस्तांतरण अशा सिडको अखत्यारीत असणारे विविध विषयांसंदर्भात बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या धान्य मार्केट, भाजीपाला, फ्रुट व कांदा बटाटा मार्केटच्या व्यापार्‍यांसह सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबर बैठक झाली. …

Read More »

पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त

पनवेल : वार्ताहर प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केल्यामुळे व तत्काळ उपचार घेतल्यामुळे पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे पनवेलसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग पनवेलसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता. यात अनेकांचा मृत्युदेखील झाला. कोरोनाची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी …

Read More »

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासा; रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबई शहरात झपाट्याने कोरोना संसर्ग पसरल्याने एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळ हा 80 दिवसांपर्यंतखाली आला होता. आता दुसरी लाटेत रुग्ण कमी झाले असून रुग्णदुपटीचा कालावधी 1208 दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी उरण तालुका पत्रकार संघाचा ठराव

उरण : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धंनजय गोंधळी यांनी केली. या मागणीस उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांनी मान्यता दिली. लोकनेते दि. बा. पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या जागेवर …

Read More »

नगरसेविका सुशिला घरत यांच्या निधीतून डस्टबिनचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका सुशिला घरत यांनी आपले शहर स्वच्छ आणि रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत शनिवारी त्यांच्या 2020-2021च्या नगरसेविका निधीमधून नवीन पनवेल येथे डस्टबिनचे वाटप केले. कचरा रस्त्यावर फेकण्याऐवजी डस्टबिनमध्ये टाकून आपला परिसर व त्याभोवतालची स्वच्छता राखावी, असे आवाहनही या वेळी सुशिला घरत यांनी केले. या …

Read More »

उसरण धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त उसरण धरण निर्माणानंतर जवळपास 32 वर्षांनी प्रथमच या धरणाच्या अनुषंगाने नाल्यातून जाणारे गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासाठी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे. देवळोली गावजवळ 1989 साली उसरण या धरणाची निर्मिती झाली. डोंगर कपार्‍यात असलेल्या धरणाचे पाणी …

Read More »

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह उपनगर भागात शनिवारी (दि. 12) पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात …

Read More »

आता घरीच मिळणार लर्निंग लायसन्स

पेण : प्रतिनिधी लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. या लायसन्सची ऑनलाइन प्रिंट काढता येणार असल्याने शिकाऊ चालकांची आता एजंटच्या विळख्यातून सुटका तर होणार आहेच, शिवाय खर्च आणि वेळदेखील वाचणार आहे. आजच्या घडीला अनेकजण वाहने चालवतात. मात्र, काहीजणांकडे लायसन्स नाहीत. लायसन्स काढण्यासाठी …

Read More »