पनवेल : वार्ताहर मागील सहा महिन्यांपासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 ला यश आले आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई बी. के. सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात 18 ते 44 वयोगटाचे 21 जूनपासून लसीकरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या 45 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असून बहुतांशी लसीकरण केंद्रावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा कमी नागरिकांकडून पहिल्या व दुसर्या डोसचा लाभ घेतला जात आहे. 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे 21 जूननंतर लसीकरण केंद्रावर फार …
Read More »दि. बा. पाटील यांच्या नावाला आगरी सेनेचा जाहीर पाठिंबा
खोपोली : प्रतिनिधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रायगड जिल्हा आगरी सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. 10) खालापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मानवी साखळी तयार करून तहसीलदारांना निवेदन देण्याचे रायगड जिल्हा आगरी सेनेने ठरविले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने फक्त पाच जणांना परवानगी दिल्याने …
Read More »अलिबागमध्येही ‘दिबां’च्या नावासाठी जोरदार आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 10) अलिबाग येथे मानवी साखळी करण्यात आली. भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून मानवी …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी कर्जतमध्ये मानवी साखळी आंदोलनाचा एल्गार
कर्जत : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी नेरळ ते मानिवली हुतात्मा स्मारकापर्यंत गुरुवारी (दि. 10) मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो भूमिपुत्र, नागरिक, तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या. नेरळ शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल आणि …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन
स्थानिकांकरिता रक्त सांडवणार्या लोकनेत्याचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे -आमदार रविशेठ पाटील पेण : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी रक्त सांडवले, शेतकर्यांना न्याय मिळवून दिला अशा लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 10) पेणमध्ये केले. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. …
Read More »धरण, तलाव, धबधब्यांवर जाण्यास बंदी; कर्जत प्रांताधिकार्यांचे आदेश
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये याकरिता कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश जारी केले आहेत. कर्जत उपविभागात येणार्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्टपर्यंत …
Read More »रायगडमधील कोरोना रुग्णवाढीला जबाबदार कोण?
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर सध्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 1 ते 6 जून या आठवड्यात जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर सध्या 13.14 टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 36 हजार 69 जणांना कोरोनाची बाधा झाली. एक लाख 26 हजार 416 जण बरे झाले. तीन हजार 267 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच कोरोनामुळे …
Read More »थोडीतरी जाणीव ठेवा
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे आदरणीय नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांमध्ये जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, डोंबिवली आदी विविध ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी, आगरी-कोळी बांधवांनी गुरुवारी मानवी साखळी आंदोलन केले. नियोजित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागाची रावे येथे धडक कारवाई; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
पेण : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (दि. 8) पेण तालुक्यातील रावे येथे छापा टाकून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे, उपअधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड विभागाचे निरीक्षक आनंद पवार व त्यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक अकुंश बुरकुल, रमेश चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper